मराठीटेकसोबत जोडलेले रहा
Gmail icon

12/13/2014

Xiaomi ला भारतात विक्रीसाठी बंदी
दिल्ली कोर्टाने Ericsson कंपनीच्या पेटंट दाव्याबद्दल दाखल केलेल्या केस वरती निर्णय देताना Xiaomi वर विक्री, असेम्ब्ली आणि इम्पोर्ट करण्यावरही बंदी घातली आहे. कस्टम्स अधिकार्‍यांनाही याबाबत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले असून Xiaomi ने कोर्टाच्या पुढील निर्णयापर्यंत सर्व प्रकारची विक्री पुर्णपणे थांबवली आहे.    या केसबद्दल एरिक्सन कंपनीच असं म्हणणं आहे की त्यांनी Xiaomi शी तब्बल 3 वर्ष लायसेंसवर चांगल्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला मात्र Xiaomi ने प्रतिसाद देण्यास कायम नकार दिला. त्यामुळे शेवटी आम्हाला कायद्यानुसार अॅक्शन घ्यावी लागली.

कोर्ट ऑर्डरवर प्रतिक्रिया देताना Hugo Barra (Xiaomi व्हीसी) यांनी असं म्हटलय की दिल्ली कोर्टाच्या आदेशामुळ आम्हाला भारतातील विक्री थांबवावी लागत असून आम्ही काळजीपूर्वक या केसवर लक्ष देत आमच्या पुढील कायदेशीर पर्यायांबद्दल विचार करत आहोत. आम्हाला दोन दिवसात फ्लिपकार्टवरती जवळपास 150000 RedMi Note साठीच्या रजिस्ट्रेशन्स मिळाल्या आहेत.

Xiaomi च्या पाच महिन्याच्या कलावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या तर भारत हाच चीनपेक्षा मोठा ग्राहक असल्यामुळे त्यांचं या केसमुळे नक्कीच नुकसान होणार आहे. आता मात्र Xiaomi ने एरिक्सनशी बातचीत करण्यास सहमति दर्शवली आहे. एरिक्सनने यापूर्वी मायक्रोमॅक्सवर सुद्धा अशीच केस दाखल केली होती. आता ह्यावेळी Xiaomi ला फेब्रुवरी २०१५ पर्यंत त्यांचं कोणतही प्रॉडक्ट भारतात विकता येणार नाही.
तोपर्यंत कोणताही फ्लॅश सेल फ्लिपकार्टवर नसेल हे नक्की      

अपडेट (16-12-201) :: Xiaomi वरची बंदी काही प्रमाणात उठवण्यात आली असून कंपनीला Snapdragon प्रॉसेसर असलेले फोन्स विकण्याची परवानगी देण्यात आली आहे