पेपॅल (Paypal) आता भारतात उपलब्ध : आंतरराष्ट्रीय व्यवहार सोपे!

पेपॅल ही एक ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देणारी अमेरिकन कंपनी असून नेहमीच्या चेक, रोख व्यवहारांना जागतिक पातळीवर पर्याय उपलब्ध करून देते. बरीच वर्षं बाहेरून सुरू असलेला या कंपनीचं कामकाज आता भारतात सुद्धा सुरू होत आहे. यामुळे देशांतर्गत व्यवहारांसोबत आंतरराष्ट्रीय/इतर देशांमध्ये व्यवहार करणंसुद्धा सोपं होणार आहे. पैसे देणे, घेणे, रिफंड यासारख्या गोष्टी पेपॅलद्वारे सहज करता येतात.
आज रोहन महादेवन (अधिकारी, पेपॅल) यांनी याबाबत माहिती जाहीर केली. paypal.co.in

तूर्तास ही सेवा बुकमायशो, मेकमायट्रिप, PVR सिनेमा, अभीबस, यात्रा, पेपरफ्राय अशा काही मोजक्या साईटवर वापरता येईल. लवकरच सर्व ऑनलाईन साईट पेपॅलचा वापर सुरु करतील.

Peter Thiel, Elon Musk, Ken Howery, Luke Nosek, Max Levchin यांनी पेपॅलची १९९८ मध्ये सुरुवात केली होती. ऑनलाईन पेमेंटसाठी फारसे पर्याय नसताना सुरु केलेली ही सेवा प्रसिद्ध झाली. बऱ्याच साईटवर डेबिट/क्रेडिट कार्ड यांना सुरक्षित पर्याय म्हणू वापरली जात आहे! २००२ मध्ये पेपॅल इबे या शॉपिंग वेबसाइटनी अधिग्रहित केली त्यानंतर २०१४ मध्ये पेपॅलला परत स्वतंत्र कंपनी करण्याचा निर्णय झाला.
अनेक ग्राहक पेपॅल भारतात सुरु होण्याची वाट पाहत होते. पेपॅल द्वारे बाहेरील देशांमधील वेबसाईटवरून वस्तू मागवता येतात ज्या भारतात उपलब्ध नसतात, थेट मागवल्यामुळे स्वस्तसुद्धा मिळतात!

search terms : paypal india payments online shopping security bookmyshow makemytrip abhibus
पेपॅल (Paypal) आता भारतात उपलब्ध : आंतरराष्ट्रीय व्यवहार सोपे! पेपॅल (Paypal) आता भारतात उपलब्ध : आंतरराष्ट्रीय व्यवहार सोपे! Reviewed by Sooraj Bagal on November 08, 2017 Rating: 5

1 comment:

  1. Finally use Paypal in India online shopping will be great.

    ReplyDelete

Powered by Blogger.