गूगल मॅप्सवर मारीयो दाखवेल मार्ग!

निंटेंडोच्या मारीयो या प्रसिद्ध गेम मधील 'मारीयो'च्या दिनानिमित्त (१० मार्च) गूगल व निंटेंडोने भागीदारी करून ही गंमत सादर केली आहे (ईस्टर एग) ज्याद्वारे आपण गूगल मॅप्स अॅपवर ठिकाणासाठी दिशा पाहताना मार्गावर बाणाऐवजी मारीयो फिरताना दिसेल! भारतात १२ मार्चपासून ही गंमत पाहता येईल!

यासाठी नेहमीप्रमाणे तुम्ही उभे असलेले जागा ते जाण्याचं ठिकाण यांच्या डायरेक्शन्स पहा. त्यानंतर उजव्या कोपर्‍यात खाली एक प्रश्नचिन्ह (?) असलेली मारीयो गेममधील आयकॉन दिसेल त्यावर स्पर्श करा. नेहमीच्या बाणा ऐवजी मारीयो दिशा दाखवण्यास सुरू करेल! गूगल मॅप्स अपडेट केलेलं असावं. जर तुम्हाला डायरेक्शन्स पाहताना खालील प्रमाणे पर्याय दिसला तरच हे वापरता येईल. मात्र मारीयो केवळ एक आठवडाच गूगल मॅप्सवर असेल ! अधिकृत माहिती : http://goo.gl/1vJMbU

google maps app mario cart easter egg
गूगल मॅप्सवर मारीयो दाखवेल मार्ग! गूगल मॅप्सवर मारीयो दाखवेल मार्ग! Reviewed by Sooraj Bagal on March 10, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.