MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

गूगल क्रोमची किमया

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 29, 2012
in इंटरनेट, सॉफ्टवेअर्स, ॲप्स
ADVERTISEMENT
गूगल क्रोमची अॅपलच्या iOS साठीची मोफत आवृत्ती अॅप्लिकेशन स्टोरवरती पहिल्या क्रमांकाची जागा पटकावण्यात यशस्वी झाली आहे(मुख्य मोफत) . तब्बल ३१०० लाख  वापरकर्त्यांसह क्रोमने जवळपास १०० टक्के वाढ गेल्यावर्षी नोंदवली आहे. याधीच्या वर्षी हीच संख्या १६०० लाखांपर्यंत होती.गूगल क्रोम हा  जगातील सर्वात वेगवान वेब ब्राऊजर आहे.(डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा—-गूगल क्रोम )

Chrome for iOS Tops App Store

दरदिवशी  क्रोमच्या  वापरकर्त्यांकडून सुमारे १ TB (टेराबाइट) एवढा माहितीचा साठा डाऊनलोड केला जातो आणि ६०० लाख शब्द  लिहिले जातात (माऊंटेन व्यूच्या संघाच्या माहितीनुसार ). गूगलने असेही सांगितले आहे की त्यांच्या क्रोमच्या वेगवान प्रकट होण्याच्या तंत्रामुळे वापरकर्त्यांचा तब्बल १३ वर्षांचा कालावधी वाचवला आहे आणि आम्ही त्या तंत्राला धन्यवाद देऊ इच्छितो.

क्रोमच्या synthesize म्हणजेच आपली माहिती (जसे की पासवर्ड,बूकमार्क,हिस्टरी)  आपल्या गूगल अकाऊंटवर साठवून   ती माहिती पुन्हा इतर कोणत्याही क्रोम असलेल्या साधनामध्ये वापरू शकतो.त्यामुळे आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवावा लागत नाही. तसेच आपले नाव ,ईमेल ,पत्ता ह्या गोष्टी पुढील प्रत्येक वेळी आपोआपच टाकल्या जातात.
हा ब्राऊजर आपल्याला Private ब्राऊजिंग करण्याची सुविधा देतो ज्यामध्ये आपले पासवर्ड आणि हिस्टरी साठवली जात नाही ही सुविधा आपल्याला आपण जेव्हा नेट कॅफे सारख्या ठिकाणाहून सर्फिंग करताना उपयोगी पडते.ज्यासाठी सेटिंग्समध्ये New Incognito Window वरती क्लिक करावे लागते.

चार वर्षांपूर्वीच ब्राऊजर मार्केटमध्ये येऊन गुगल क्रोमनेचांगलीच बाजी मारली आहे . यामध्ये त्यांनी घेतलेल्या भरा-या आणि आणलेल्या सुविधा वेब जगताला थक्क करणा – या होत्या . या ब्राऊजरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते मॅक , लिनक्स , अँड्रॉइड आणि आयओएस अशा विविध ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणारे व्हर्जन्स बाजारात आणले आहेत . क्रोम हे एकमेव असे ब्राऊजर आहे की , जे आपल्याला लॅपटॉप , डेस्कटॉप , मोबाइल अशा सर्व ठिकाणी एकाच लॉगइनवरून उपलब्ध होऊ शकते . यासाठी केवळ आपल्याला क्रोमचं लॉगइन करावं लागतं .एकदा का तुमचं लॉगइन झालं की तुम्ही कोणतंही डिवाइस हातात घ्या आणि ब्राऊजिंगचा आनंद लुटा . क्रोमच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त त्याची काही खास वैशिष्ट्ये आणि एक्सटेन्शन … 

इनकाँगनिटो मोड : इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये असलेली इनप्रायव्हेट ही सुविधा क्रोममध्ये इनकाँगनिटो मोड यानावाने उपलब्ध करून देण्यात आली आहे . ही सुविधा नुकतीच मुख्य प्रवाहात आणली आहे . यापूर्वी याचं ट्रायल व्हर्जनच उपलब्ध होतं .

वेब स्टोअर : क्रोमने अनेक सुविधा प्रथम बाजारात आणल्या . यातील एक महत्त्वाची सुविधा म्हणजे वेब अॅप्स .यामध्ये अँग्री बर्डपासून ते अनेक गाजलेल्या अॅप्सचा समावेश आहे . 

ट्रान्सलेटर : क्रोमने गुगलची ट्रान्सलेटर ही सुविधा इतर ब्राऊजर्सपेक्षा वेगळी सुरू केली आहे . यातीलभाषांतराचा दर्जा इतर ब्राऊजर्सवरील ब्राऊजर्सपेक्षा खूपच चांगला आहे . यासाठी गुगलने खास सुविधा लाँच केलीआहे .

गुगल क्रोम हे सर्वाधिक वापरले जाणारे आणि लोकांना आवडणारे हे ब्राऊजर असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातसमोर आले आहे . या ब्राऊजरचा सर्वाधिक वापर हा एचटीएमएल 5 वापणाऱ्यांनी केला आहे . यामुळे यातील सर्वसुविधा अॅडव्हान्स बनविण्यात येत आहेत . क्रोमच्या विविध सुविधांमुळे टेकसॅव्हींच लाइफ खूप चांगलं झालं आहे .याची काही उदाहरणं देता येतील ती , क्रोच्या विविध एक्स्टेन्शन्सची . 

स्क्रीन कॅप्चर : सध्या विविध कारणांनी आपण आपली स्क्रीन फोटो फाइल म्हणून सेव्ह करत असतो . क्रोमनेनेमकी हीच लोकांची सवय हेरली आणि आपल्या ब्राऊजरला फुल स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे .आपण जेव्हा ‘ प्रिंट स्क्रीन ‘ करून फोटो फाइल सेव्ह करतो तेव्हा तो आपल्याला क्रॉप न करता सेव्ह करता येऊशकतो . 

सुमो पेंट : कॅप्चर स्क्रीनबरोबरच फोटो सेव्ह करण्यासाठी आणि एडीट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पेंटसारखंच काम करणारं सुमो पेंट नावाचं एक्स्टेन्शन क्रोमने उपलब्ध करून दिलं आहे . यामध्ये आपल्या फोटोला विविध लेअर्स देणं , फिल्टर्स , ब्लर , शार्पन , बर्न असे विविध इफेक्ट्स देता येऊ शकतात . याचबरोबर कर्व्ह , कलर बॅलन्सयाही सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत . 

ड्रॅग अॅण्ड ड्रॉप सर्च : तुम्ही सातत्याने सर्च करत असलेल्या विविध फाइल्स क्रोम सेव्ह ठेवतो . यामुळे आपण थेटत्या सर्च पेजवर जाऊ शकतो . याचबरोबर एखादं सर्च आपल्याला नको असेल तर ते आपण याचा वापर करूनड्रॉपही करू शकतो . 

अॅडब्लॉक प्लस : सर्च करताना अनेकदा जाहिराती पॉपअप होत असतात . हे टाळण्यासाठी अॅडब्लॉक प्लस हेएक्स्टेन्शन उपलब्ध करून देण्यात आलं आहे . यासाठी तुम्हाला एक छोटीशी फाइल इन्स्टॉल करावं लागते .

source :engadget
Tags: AndroidAppsBrowserChromeiOSSoftwares
ShareTweetSend
Next Post

मायक्रोसॉफ्टच्या नवीन आउटलूक मेलला केवळ सहा तासात एक दशलक्ष नवीन वापरकर्ते मिळाले आहेत

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
WhatsApp HD Photos

व्हॉट्सॲपवर फोटोज आता HD क्वालिटीमध्ये पाठवता येणार!

August 18, 2023
मेटाचं नवं Threads ॲप उपलब्ध : ट्विटरशी थेट स्पर्धा!

मेटाचं नवं Threads ॲप उपलब्ध : ट्विटरशी थेट स्पर्धा!

July 6, 2023
Apple WWDC 2023

ॲपलचा WWDC23 कार्यक्रम : iOS 17, macOS Sonoma अपडेट्स जाहीर!

June 6, 2023
Next Post
मायक्रोसॉफ्टच्या नवीन आउटलूक मेलला केवळ सहा तासात एक दशलक्ष नवीन वापरकर्ते मिळाले आहेत

मायक्रोसॉफ्टच्या नवीन आउटलूक मेलला केवळ सहा तासात एक दशलक्ष नवीन वापरकर्ते मिळाले आहेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

August 24, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

व्हॉट्सॲपवर फोटोज आता HD क्वालिटीमध्ये पाठवता येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!