MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

घरगुती पवनचक्की : टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती (सतीश पाटील निर्मित )

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 14, 2012
in News

                                                      जळगाव – भरमसाट येणारे वीजबिल व दिवसेंदिवस
वाढणारे भारनियमन, यामुळे आज सर्वच जण त्रस्त
आहेत. जळगावमधील शिक्षक आणि संशोधक असलेल्या सतीश पाटील यांनी यावर मात करत उपाय शोधून
काढला आहे. त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर पवनचक्की तयार केली. यातून वीजनिर्मिती
होऊन पाटील यांच्या घराचे वीजबिल निम्म्यावर आले आहे. त्यांनी ही पवनचक्की टाकाऊ वस्तूंपासून
तयार केली आहे.
सतीश पाटील यांनी घरगुती पवनचक्की तयार
करण्यासाठी सुरवातीला इंटरनेटमधून माहिती मिळविली. इलक्‍ट्रिकलचे थोडे ज्ञान असल्याने
त्यांना हे शक्‍य वाटू लागले. मोठी अडचण होती ती सुट्या भागांची. यावरही मात करत त्यांनी
पवनचक्कीला लागणारे पाते पीव्हीसी पाइप कापून बनवले; तर
जनरेटरसह काही भाग मुंबई आणि जळगावच्या भंगार बाजारातून मिळविले.
                                         अशी आहे रचना
तारेच्या वेटोळ्यात चुंबक फिरवल्यास त्यामध्ये
विद्युत शक्ती निर्माण होते, हा सिद्धांत
त्यांनी यात वापरला आहे. जळगाव जिल्ह्याचा वाऱ्याचा वर्षभराचा सरासरी वेग पाच ते दहा
किलोमीटर एवढाच आहे. वाऱ्याने पवनचक्कीचे पाते फिरतात. त्यामुळे दोन चुंबकांमध्ये तारांचे
वेटोळे फिरते. त्यामधून विजेचा “एसी’ प्रवाह तयार होतो.
तो “डीसी’मध्ये रूपांतरित केला जातो. हा प्रवाह बॅटरीमध्ये
साठविला जातो. नंतर इन्व्हर्टरकडे दिला जातो.
दहा हजारांचा खर्च
दिवसभरात दीडशे अँपिअरची बॅटरी आठ तासांत
पूर्ण चार्ज होते. पवनचक्कीतून येणारा प्रवाह एसी प्रकारचा १८ होल्टपासून ५० व्होल्टपर्यंत
असतो. साधारण: एका तासात ३०० वॉट या दराने प्रवाह वाहतो. ही ऊर्जा २३० व्होल्टमध्ये
रूपांतरित झाल्यानंतर त्यावर घरातील ट्यूब, पंखे,
टीव्ही, मिक्‍सर अशी सर्व उपकरणे चालतात. यासाठी
सुमारे दहा हजार रुपये खर्च आल्याचे पाटील यांनी सांगितले.
टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती
पवनचक्की आणि त्याला लागणारी उपकरणे प्रत्येकाला
घरीच तयार करणे शक्‍य असल्याचे पाटील म्हणाले. त्यासाठी अडगळीत पडलेले पाइप चक्कीचे
ब्लेड बनविण्यास वापरात येतात. भंगारमध्ये पडलेले अँगल सहज उपलब्ध होतात. जुने बंद
पडलेले जनरेटर तांब्याच्या तारा आणि चुंबक वापरून सुरू करता येऊ शकते. या सर्वांची
योग्य रीतीने जोडणी केली, तर पवनचक्की
घरी तयार करू शकतो. ही साधने मिळाली, तर हा खर्च आणखी कमी करता
येऊ शकतो.
पाटील यांचे यशस्वी प्रयोग
संशोधक वृत्ती असलेल्या सतीश पाटील यांनी
आजवर अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी घशाच्या ऑपरेशनसाठी तयार केलेल्या “ब्रांकोस्कोप’ला पेटंटही मिळाले आहे. तसेच “इ-बॅग’, जवानांसाठी
विशिष्ट प्रकारचे हेल्मेट, इलेक्‍ट्रॉनिक जॅक, कैरी फोडण्याचा विशिष्ट प्रकारचा सुडा, पीव्हीसी पाइपचा
तराफा असे प्रयोग यशस्वी करून दाखविले आहेत.
– पवनचक्कीमुळे वीजबिल निम्म्यावर
– आठ तासांत होते बॅटरी पूर्ण चार्ज
– दहा हजारांत तयार होते पवनचक्की
– टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती
– विजेवर चालतात सर्व उपकरणे
————-
संशोधक सतीश पाटील
भ्रमणध्वनी क्रमांक : 9422618324
ई-मेल : [email protected]      
सौजन्य  :  
ADVERTISEMENT
Tags: DIYHow ToScienceWindmill
ShareTweetSend
Previous Post

अ‍ॅपलचा आयफोन -5 सादर : नाविण्याचा अभाव 20 % हलका आणि 18 % स्लीम

Next Post

गॅझेट फंडा: सॅमसंगचा चॅट फोन ( स्वस्तात मस्त )

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
UPI 123Pay Offline

UPI आता फीचर फोन्सवरही उपलब्ध : इंटरनेटशिवाय पैसे पाठवा : UPI123Pay

March 8, 2022
Webb Space Telescope

James Webb टेलिस्कोपचं प्रक्षेपण : सर्वात मोठा व शक्तिशाली स्पेस टेलिस्कोप

December 26, 2021
How To Make WhatsApp Stickers

व्हॉट्सॲपवर आता स्टीकर्स तयार करण्याचाही पर्याय!

November 29, 2021
Next Post
गॅझेट फंडा: सॅमसंगचा चॅट फोन ( स्वस्तात मस्त )

गॅझेट फंडा: सॅमसंगचा चॅट फोन ( स्वस्तात मस्त )

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech