डेस्कटॉपही झालाय स्मार्ट

गेल्या काही दिवसांत लिनोवो या कंपनीने घराघरात प्रवेश करून डेस्कटॉपवर आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता लिनोवोच्या आयडिया सेंटर ए ७२०ने भरच घातली आहे. लिनोवोचा हा डेस्कटॉप अ‍ॅपलच्या पीसीप्रमाणे दिसणारा आणि मोहक असाच आहे. त्याचा लूक थेट अ‍ॅपलचीच आठवण करून देणारा आहे. मुळात त्याचा स्क्रीन अतिशय सडपातळ आहे. तो केवळ २४.५ मिमी जाडीचा आहे. त्याची क्षमता ही तब्बल एक टेराबाईट हार्डडिस्कची असून अद्ययावत व वेगवान प्रोसेसर ही त्याची ओळख आहे. त्याची काही महत्त्वाची वैशिष्टय़े याप्रमाणे—
१)     १० पॉइंटस् मल्टिटच स्क्रीन
२)     सुपर स्लीम व फ्रेमलेस डिस्प्ले
 
३) तब्बल ९५ अंशापर्यंत वाकवता येतो.
४) एनव्हीडिआ जीइफोर्स जीटी ६३० एम 
    २ जीबी डिस्क्रीट ग्राफिकट
५) इंटिग्रेटेड टीव्ही टय़ूनर
६) एचडीएमआय इन अ‍ॅण्ड आऊट
७)     इंटिग्रेटेड स्टीरिओ स्पीकर सपोर्टिंग 
      डॉल्बी होम थिएटर
८)     ब्लू रे डिस्क कॉम्बो
९) १०८० पी एलइडी डिस्प्ले 
१०) ७२० पी एचडी वेबकॅम
११)     ६४ जीबीपर्यंत एसएसडी स्टोरेज
१२) अल्ट
१०) ७२० पी एचडी वेबकॅम
११) ६४ जीबीपर्यंत एसएसडी स्टोरेज
१२) अल्ट्रास्लीम वायरलेस की बोर्ड 
१३) थर्ड जनरेशन इंटेल कोअर आय सेव्हन प्रोसेसर
भारतीय बाजारपेठेतील किंमत  रु. ८९,९९० /-


एचपी कॉम्पॅक एलिट ८३००
डेस्कटॉप आणि लॅपटॉपमध्ये आजही जगभरात सर्वाधिक खात्रीशीर असलेले नाव म्हणजे एचपी अर्थात ह्य़ुलेट पॅकार्ड. याच एचपीने अलीकडे सर्वच आर्थिक स्तरांतील ग्राहकांसाठी वेगवेगळे डेस्कटॉप आणि लॅपटॉप्स बाजारात आणले आहेत. त्यातही त्यांनी बाजारात आणलेल्या एचपी कॉम्पॅक एलिट ८३०० ची सध्या सर्वाधिक चर्चा आहे. याची काही महत्त्वाची वैशिष्टय़े याप्रमाणे
१)    इंटेल कोअर आय फाइव्ह प्रोसेसर
२)    कर्णरेषेत २३ इंच असलेला फूल एचडी डिस्प्ले
३)    स्टँडर्ड एसआरएस प्रीमियम साऊंड प्रो
४)    इंटेल एचडी ग्राफिक्स टच फंक् शनॅलिटीसह
५)    १६ जीबीपर्यंत रॅमची क्षमता वाढविता येते.
६)     एक टेरा बाईटची हार्डडिस्क
७)     सॉलिड स्टेट ड्राइव्ह २५६ जीबीपर्यंत
८)    २ मेगापिक्सेल वेबकॅम व डय़ुएल मायक्रोफोन्स
९)     मल्टिटच ऑपरेशन्स. 
१०)    इंटरॅक्टिव्ह ऑपरेशन्स

Exit mobile version