आयपॅडपेक्षा १० हजार रुपये स्वस्त आहे अमेझॉन किंडल !

नवी दिल्ली – अमेझॉनने गुरुवारी त्यांचा नवा टॅबलेट आणि ई-रिडीर लॉन्च केला. तज्ज्ञांचे मत आहे की, ही दोन्ही नवी उत्पादने अ‍ॅपलच्या नव्या आयपॅडसाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.
कंपनीने या आधीच घोषणा केली होती की, ते किंडल ई-रिडर आणि किंडल एचडीचे अपडेट व्हर्जन बाजारात आणणार आहे. ऑनलाईनमधील महत्त्वाची कंपनी अमेझॉनने दोन साईजमध्ये टॅबलेट लॉन्च केले आहे.  किंमतीमध्ये या टॅबलेटने अ‍ॅपलला मोठी टक्कर दिली आहे. अमेझॉनने याची किंमत २०० डॉलर इतकी ठेवली आहे.
अमॅझोन त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट किंडलचेही नवे व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. त्याचे नवे नाव हे पेपरव्हाईट असे असणार आहे (रु. 26000~).  पहिल्या किंडलपेक्षा हा टॅबलेट आणखी पातळ आणि पुस्तकांची पाने १५ पट अधिक वेगाने उलटणार आहे.
सौजन्य:  
Exit mobile version