MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

बखर ई-मेलची

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 16, 2012
in News, इंटरनेट
आपल्या कार्यालयीन दिवसाची सुरुवात आणि शेवट ही ई-मेलनेच होते. म्हणता म्हणता आपल्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनलेला या ई-मेलला नुकतेच ४१ वर्षे पूर्ण झालीत. आपल्याकडे अवघ्या दहा वर्षांपूर्वी ओळख झालेल्या या ई-मेलने आपल्या कामकाजात मोठी सुसूत्रता आणली आहे. पण या ई-मेलची जन्मकथा फारच सुरेख आहे. पूर्वी ई-मेलसाठी गरज असलेल्या कम्पुटरची जागा आता मोबाइलने घेतली आहे. ई-मेलच्या या प्रवासातील काही महत्त्वाचे टप्पे… 

१९७१ ः QWERTYUIOP हा जगातील पहिला ई-मेल. अमेरिकेतील प्रोग्रामर रेमंड टोमलिसन याने पाठविलेला हा पहिला नेटवर्क ई-मेल. रेमंड हा असा पहिला व्यक्ती होता की , ज्याने आपल्या कम्प्युटरचा मेलबॉक्स @ चिन्ह वापरून कनेक्ट केला. 

१९७७ ः रेमंड यांची ई-मेलची पद्धत वापरण्यासाठी ई-मेल पाठवणा-याच्या आणि ई-मेल स्वीकारण्याच्या दोघांच्याही कम्प्युटरमध्ये एक विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असण्याची गरज होती. त्याकाळात ‘ डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क ‘ ( एआरपीए) याचा वापर होत होता. यामुळे रमेंडच्या ई-मेल प्रणालीचा फारसा उपयोग होत नव्हता. 

१९८१ ः नेटवर्कमध्ये अक्षरे , सिम्बॉल्स आणि स्पेशल कॅरॅक्टर्सचा वापर करता यावा यासाठी अमेरिकन स्टॅर्ण्डड कोड फॉर इन्फॉरमेशन इंटरचेंजचा वापर करण्यात आला. 

१९८५ ः या कालावधीत अमेरिकेन सरकार , सुरक्षा जवान , विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना प्रत्येकी एक ई-मेल आयडी देण्यात आला. 

१९९१ ः इंटरनेट सिक्युरिटी प्रोटोकॉल्सने (आयएसपी) इंटरनेटच्या वापराच्या कक्षा रूंदावण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यालाही खूप मर्यादा होत्या. अखेर टीम बेरनर्स ली यांनी वर्ल्ड वाइड वेब ही संकल्पना मांडली आणि इंटरनेटचा कायापाटल झाला. 

१९९१ ः अंतराळवीर शॅनन लुसिड आणि जेम्स अॅडम्सन याने अंतराळातून स्टीव जॉब्ज यांनी तयार केलेल्या मॅकिन्टोश या मशीनवर ‘ हॅलो अर्थ , ग्रीटींग्ज फ्रॉम एसटीएस-४३ क्रू. हा अंतराळातून आलेला अॅपल लिंकवरचा पहिला मेसेज आहे. हॅविंग ग्रेट टाइम. ‘ असा ई-मेल पाठवला. 

१९९३ ः फोन , कॅल्क्युलेटर , फॅक्स , ई-मेल आणि पेजर असं एकाच यंत्रात वापरता येणारे अनोखे गॅजेट आयडीएम आणि बेल साऊथ यांनी तयार केले. 

१९९७ ः मायक्रोसॉफ्टने जगातील पहिली-वहिली ई-मेल सेवा हॉटमेल ४०० दशलक्ष डॉलर्सला विकत घेतली. 


१९९८ ः इंटरनेटचा याचबरोबर ई-मेला वापर सुरू झाला. मात्र त्यात वापरण्यात आलेल्या शब्दांना भाषेच्या दृष्टीने कोणतेही महत्त्व नव्हते. अखेर ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये ‘ स्पॅम ‘ हा शब्द दाखल झाला आणि या शब्दांना रोजच्या जीवनात महत्त्व प्राप्त होऊ लागले. 

२००३ ः रिसर्च इन मोशन या कंपनीने ८५० आणि ८५७ हे दोन ब्लॅकबेरीचे फोन बाजारात आणले. यातून पहिल्यांना मोबाइलवर ई-मेल वापरण्याची सुविधा उपलब्ध झाली. 

२००४ ः अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी पॉर्नोग्राफी आणि मार्केटिंग कायदा मंजूर केला. मात्र या कायद्यात दोषींवर कारवाई करण्याची कोणतीही तरतूद नव्हती. 

२०१२ ः जगभर ई-मेल वापरणा-यांची संख्या ही तीन अब्ज इतकी आहे. दिवसाला २९४ अब्ज ई-मेल्स पाठविले जातात. यातील ७८ टक्के मेल्स हे स्पॅम असतात. 

ADVERTISEMENT
Tags: EmailHistory
ShareTweetSend
Previous Post

ट्विटर अकाऊंट करा स्मार्ट

Next Post

विंडोजला अँड्राइडचा सहारा

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
Gmail Email Attachments

जीमेलवर ईमेलद्वारे ईमेल्स पाठवता येणार : ईमेल अटॅचमेंट्स उपलब्ध!

December 10, 2019

यूट्यूब अँड्रॉइड अॅपवर Incognito Mode आणि Dark Mode उपलब्ध!

July 31, 2018
जीमेलने सादर केलीये पाठवलेला ईमेल रद्द करण्याची सोय !

जीमेलने सादर केलीये पाठवलेला ईमेल रद्द करण्याची सोय !

June 24, 2015
Next Post
विंडोजला अँड्राइडचा सहारा

विंडोजला अँड्राइडचा सहारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech