अनोळखी ‘फेसबुकर’ला मेसेजसाठी १ डॉलर!

facebookआपण फेसबुकवर भ्रमंती करत असतो… अचानक आपल्यालाएखादा चेहरा, एखादं प्रोफाइल आवडतं… त्याच्याशी / तिच्याशी मैत्री करावीशी वाटते आणि आपण लगेचच त्याला’ फ्रेण्ड रिक्वेस्ट ‘ पाठवतो… कधीकधी या रिक्वेस्टसोबतमेसेजही पाठवतो . मात्र आता अशा अनोळखी (नॉन-फ्रेण्ड) ‘फेसबुकर ‘ ला मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला एक डॉलर, अर्थात ५० रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे . या संकल्पनेवर फेसबुक प्रायोगिक तत्वावर काम करतंय. 

तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहेकिंवा एखादी कंपनी तरुणांना जॉब ऑफर्सबद्दल कळवू इच्छिते, तर त्यांना प्रत्येक मेसेजसाठी एक डॉलर मोजावालागणार आहे . त्याबदल्यात, हा मेसेज रिसिव्हरकडे महत्वाच्या मेसेजमध्ये जाईल आणि त्याबद्दल त्याला लगेचच सूचना मिळेल. मेसेजला शुल्क लागू केल्याने स्पॅम मेसेज आणि मेसेजमार्फत पाठवण्यात येणा – या व्हायरसलाआळा बसेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे . 

सध्या फेसबुकमध्ये अदर्स नावाने असणा – या मेसेज फोल्डरमध्ये कमी महत्त्वाचे मेसेज येतात . नॉट व्हाइट स्पॅमया पर्यायामुळे सोशल नेटवर्किंगमध्ये अनोळखी लोकांनी पाठवलेले मेसेजेस साठवता येतात. हे फोल्डर उपलब्धअसूनही अनेकांना या फोल्डर्सबद्दल माहिती नसते किंवा ते या सेटिंगकडे दुर्लक्ष करतात . 

ऑक्टोबर महिन्यापासून फेसबुकने पेड पोस्टची सेवा सुरू केली आहे . त्यामुळे तुमची पोस्ट लोकांना लवकर ,स्पष्टपणे आणि अधिक काळ दिसते . अनेक युझर्स ७ डॉलर देऊन पेड पोस्टमार्फत जाहिरातदारांप्रमाणे जास्तवेळफेसबुक अपडेट्समध्ये आपली पोस्ट ठेवत असल्याने त्यांनाही फायदा होत आहे .

Exit mobile version