MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

चिनी ड्रॅग्रनला भारत देणार ‘सुपर’ झटका

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 4, 2012
in News
 ‘ सुपर – सुपरकॉम्प्युटर ‘ च्या निर्मितीसाठी भारत , चीन , जपान , अमेरिका यांच्यात सुपरकॉम्पिटीशन सुरु झाली आहे . येत्या आठ वर्षात सुपर – सुपर कॉम्प्युटर तयार होईल . निर्मितीत भारत सगळ्यांवर मात करेल . अगदी चीनवर सुध्दा , असा विश्वास सुपर कॉम्पुटरचे जनक डॉ . विजय भटकर यांनी व्यक्त केला आहे . 

गेल्या शतकात मानवी जीवनात तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणला तो संगणकानेच . पाश्चात्यांकडून आपण ते तंत्रज्ञान आयात केलं . त्यानंतर झालेले महत्त्वाचे संशोधन म्हणजे महासंगणक ( सुपर कम्प्यूटर ). पाश्चात्यांनी हे तंत्रज्ञान आपल्याला देण्याचे नाकारले . भारताचे प्रसिध्द वैज्ञानिक डॉ . विजय भटकर यांनी हे आव्हान स्विकारले आणि भारतानेच महासंगणक तयार केला. भारताच्या याच सुपुत्राने आता महा – महासंगणक तयार करण्याचा ध्यास घेतलेला आहे . 

आजचा सुपर कम्प्यूटर म्हणजे उद्याचा लॅपटॉप 

‘ तंत्रज्ञानामुळे आज जग झपाट्याने बदलते आहे . प्रत्येक क्षणी एक नवे तंत्रज्ञान जन्माला येत आहे . आजचा सुपरकम्प्यूटर हा उद्याचा लॅपटॉप झालेला असेल . त्यामुळे बदलत्या काळासोबत अपडेट राहणे आवश्यक आहे . हे जरीखरे असले तरीसुध्दा इतरांच्या एक पाऊल पुढे जाण्याचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे . याच गरजेतून२००८ साली महा – महासंगणकाची संकल्पना पुढे आली . २०१० साली याबाबत शासनापुढे प्रस्ताव मांडण्यातआला . हा प्रस्ताव मान्य करीत त्यासाठी ११ हजार कोटीं रूपयांचा निधी देण्याचे शासनाने कबूल केले आहे .बाराव्या पंचवार्षिक योजनेत शासनाने त्यासाठी ५ हजार कोटींचा निधी मान्य केला ,’ अशी माहिती डॉ . भटकरयांनी मटाशी बोलताना दिली . 

अडचणच असते ‘ इनोव्हेशनची ‘ जननी 

‘ एक अब्ज अब्ज प्रक्रिया ( एक ‘ एक्झा ‘) एका सेकंदात करण्याइतकी गती या संगणकाची असेल . परिणामतःत्यासाठी ‘ ५ हजार मेगा वॅट ‘ इतकी उर्जा लागणे अपेक्षित आहे . मात्र उर्जेचा तुटवडा असताना एवढी वीज केवळएका प्रकल्पासाठी देणे भारताला अशक्य आहे . त्यामुळे २० मेगा वॅट विजेच्या सहाय्याने हे काम कसे करता येईलयासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत . एखादे मोठे ध्येय साध्य करताना अनेक अडचणी येतात . मात्र याच अडचणी ‘इनोव्हेशन्स ‘ ला जन्म देतात आणि त्यातूनच ध्येय साध्य होते ‘ असे त्यांनी सांगितले . 

एका चिपवर हजारो प्रोसेसर 

कमी उर्जेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका चिपवर हजारो प्रोसेसर्स लावण्यात येतील . त्यांना ‘ नेटवर्किंग ‘ च्यासाहाय्याने कनेक्ट करण्यात येईल , असे त्यांनी सांगितले . 

२०२० ला साकारणार महा – महासंगणक 

हा प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ आमच्या पुढे आहे . या प्रकल्पात आपण ‘ मेंटॉर ‘ म्हणून कार्यरतअसल्याचे डॉ . भटकर यांनी सांगितले . 

सामान्य माणूसही वापरेल महा – महासंगणक 

हा संगणक तयार झाल्यानंतर ‘ नॅशनल नॉलेज नेटवर्क ‘ अंतर्गत देशातील सर्व विद्यापीठांना हा जोडण्यात येईल .त्यामुळे अगदी शेतात बसलेल्या शेतकऱ्यालासुध्दा आपल्या ‘ ४ जी ‘ सुविधेद्वारे या संगणकाशी कनेक्ट होता येईल. अर्थातच त्याच्या वापरासाठी काही नियमसुध्दा घालून दिल्या जातील . या संकल्पनेवर आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले . 

ADVERTISEMENT
Tags: IndiaInnovationSuperComputer
ShareTweetSend
Previous Post

पीसीचे टॅब्लेटमध्ये रूपांतर करणारे सोनीचे अल्ट्राबुक

Next Post

इंटरनेट एक्स्प्लोररची दहावी आवृत्ती पास

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

अग्निकुल कॉसमॉस या खासगी स्पेस कंपनीच्या अग्निबाण रॉकेटचं यशस्वी उड्डाण!

June 1, 2024
Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
जगातल्या पहिल्या सेलफोन कॉलला पन्नास वर्षं पूर्ण!

जगातल्या पहिल्या सेलफोन कॉलला पन्नास वर्षं पूर्ण!

April 3, 2023
Next Post

इंटरनेट एक्स्प्लोररची दहावी आवृत्ती पास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech