असा वापरा अँड्रॉइड फोन

नॉन मार्केट अॅप ओपन करण्यासाठी 
काही फोन वगळता बहुतांश अँड्रॉइड फोनमध्ये आपल्यालानॉन मार्केट अॅप ओपन करता येऊ शकतात . म्हणजे आपण थर्ड पार्टी अॅप्स डाऊनलोड करू शकतो . जसे की , अमेझॉन अॅप स्टोअर किंवा ऑनलाइन अॅप्समधून आपण आपल्याला पाहिजे ते अॅप्स डाऊनलोड करू शकतो . हे फीचर वापरण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन अॅप्लिकेशन सेटिंग्जमध्ये जा आणि ‘ अननोन सोर्स ‘ समोरील चौकनात टिक मार्क करा. हे केल्यावर तुम्हाला विविध अॅप स्टोअरमधील अॅप्स डाऊनलोड करता येणं शक्य होणार आहे . 


अॅप बंद करा 
अँड्रॉइड फोनमध्ये आपले अॅप्स सतत सुरू असतात .ज्यावेळेस आपण त्याचा वापर करत नसू त्यावेळी हे अॅप बंद केले तर आपली बॅटरी जास्तवेळ वापरता येऊ शकेल . हे अॅप्स बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा . त्यानंतर रनिंग सर्व्हिसेसमध्ये लिस्ट व्ह्यू करा . मग जे अॅप्स तुम्हाला नको असतील त्या अॅप्सच्या पुढे स्टॉप करून अॅप्लिकेशन बंद करा . 


अॅनिमेटेड वॉलपेपर वापरू नका 
अॅनिमेशन असलेले वॉलपेपर खूप छान दिसतात . ते एन्जॉयही करता येतात . मात्र , त्यामुळे आपल्या मोबाइलची बॅटरी खूप जास्त खर्च होते . अशावेळी तुम्ही अॅनिमेशनच्या वॉलपेपरचा वापर करू नका . हे वॉलपेपर्स बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये डिस्प्लेमध्ये जा आणि नंतर अॅनिमेशन्समध्ये जाऊन ऑल 
अॅनिमेशन्सवर टिक करा . 
स्पेशन कॅरॅक्टर म्हणजे बॅक स्लॅश , अॅट द रेट अशा किजचा क्विक अॅक्सेस पाहिजे असेल तर स्पेसबारवर टॅप करा आणि होल्ड करा . ते केल्यावर आपण नेहमी वापरत असलेल्या कॅरेक्टर्सचा बॉक्स पॉप अप करत राहतो . 


गुगल वॉइस नंबर 
कोणत्याही अँड्रॉइड फोनवर गुगल वॉइस वापरता येऊ शकतील . यामध्ये तुम्ही तुमचा डिफॉल्ट नंबर सेव्ह करूशकता . म्हणजे आपण त्या व्यक्तीचे नाव घेतले की फोन लागतो . यासाठी तुम्हाला वॉइस अॅप डाऊनलोड करावालागेल . हे अॅप तुमचा मोबाइल नंबर व्हेरीफाय करतो आणि मगच तुम्हाला ते अॅप वापरता येऊ शकते . 


सर्व अॅप फोल्डरमध्ये ठेवा 
तुमच्या होम स्क्रीनवर अनेकदा अॅप्सची गर्दी दिसते . हे टाळायचे असेल तर तुम्ही सर्व अॅप्स एका फोल्डरमध्ये सेव्हकरा . यासाठी तुमच्या मोबाइलच्या होमस्क्रीनवर टॅप करून होल्ड करा . यानंतर एक फोल्डर तयार करा आणिमग त्यात सर्व अॅप्स तुम्हाला ड्रॅग करता येऊ शकतील . 

Exit mobile version