MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

विंडोजची निळाई : मायक्रोसॉफ्ट विंडोज

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 9, 2013
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स
‘ मायक्रोसॉफ्ट विंडोज ‘ हा शब्द कधीही कम्प्युटर नहाताळलेल्या व्यक्तीलाही माहिती असेल . मायक्रोसॉफ्टनेएमएस – डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर , १९८५ रोजी ‘ विंडोज ‘ नामक ऑपरेटिंग सिस्टिम आणली .१९८४ मध्ये सादर झालेल्या ‘ अॅपल ‘ च्या ‘ मॅकिंटॉश ‘ ला मागे टाकत विंडोजने पर्सनल कम्प्युटर ( पीसी )बाजार काबीज केला आहे . ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वदटक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे . पर्सनल कम्प्युटर , ‘ विंडोज ७ ‘, सर्व्हरसाठी ‘ विंडोज सर्व्हर २००८आरटू ‘ व मोबाइल फोनसाठी ‘ विंडोज फोन ८ ‘ या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत . आता मायक्रोसॉफ्ट’ विंडोज ब्ल्यू ‘ या नावाने नवीन ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणत आहे . यानिमित्ताने मायक्रोसॉफ्टच्याऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाचा अक्षय पेंडभाजे यांनी घेतलेला हा आढावा . 


विंडोजचा इतिहास 


विंडोजचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला सप्टेंबर १९८१ पर्यंत मागे जावे लागते , जेव्हा ‘ इंटरफेसमॅनेजर ‘ हा प्रकल्प सुरू झाला . तो ‘ विंडोज ‘ या नावाने नोव्हेंबर १९८३ मध्ये घोषित झाला खरा , पण नोव्हेंबर१९८५ पर्यंत ‘ विंडोज ‘ प्रकाशित झाली नाही . ‘ विंडोज १ . ० ‘ चे बाह्यावरण ‘ एमएस – डॉस एक्झिक्युटिव्ह ‘नावाचा प्रोग्रॅम होता . कॅल्क्युलेटर , कॅलेंडर , कार्डफाइल , क्लिपबोर्ड दर्शक , घड्याळ , कंट्रोल पॅनल , नोटपॅड ,पेंट , रिव्हर्सी , टर्मिनल , राइट हे इतर पुरवलेले प्रोग्राम होते . 


विंडोज ३ . ० व ३ . १ 


विंडोज ३ . ० ( १९९० ) व ३ . १ ( १९९२ ) या ऑपरेटिंग सिस्टिम खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्ट्या यशस्वीहोत्या . अॅपल विरुद्ध विंडोज या युद्धाच्या सुरुवातीला अॅपलच्या ओएसला टक्कर देण्यासाठी विंडोजने नवीनजीयूआय , इंटेलचा ८०२८६ आणि ८०३८६ या सीपीयूना चांगला सपोर्ट या गोष्टी ३ . ० मध्ये , तर ३ . १ मधेविंडोज राजिस्ट्री , ट्रू टाइप फॉन्ट्स , मिनीस्वीपर या गोष्टींचा समावेश केला . विंडोज ३ . १ च्या दोन महिन्यांतएक लाख कॉपीज विकल्या गेल्या . 


विंडोज ९५ 


‘ विंडोज ९५ ‘ ऑगस्ट १९९५ साली प्रकाशित झाली . चार दिवसात एक लाख कॉपीज विकल्या गेल्या , असे हेओएस होते . यात विंडोजने पहिल्यांदाच स्टार्ट बटणचा समावेश केला होता . 


विंडोज ९८ 


मायक्रोसॉफ्टचे दुसरे प्रकाशन ‘ विंडोज ९८ ‘ जून १९९८ साली प्रकाशित झाले . मायक्रोसॉफ्टने १९९९ सालीयाचीच दुसरी आवृत्ती प्रकाशित केली . तिचे नाव विंडोज ९८ , सेकंड एडिशन होते . ‘ विंडोज ९८ एसई ‘ हात्याचा शॉर्टफॉर्म . या ओएसला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला . थीम सपोर्ट , थंबनेल्स , वन – क्लिकलाँच , गेमिंग साठी डायरेक्ट एक्स ६ . १ , अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात करण्यात आला होता . 


विंडोज एमई 


फेब्रुवारी २००० मध्ये ‘ विंडोज २००० ‘ बाजारात आले . या पाठोपाठ लगेजच विंडोज मिलेनियम एडिशन (एमई ) बाजारात आली . ‘ विंडोज एमई ‘ ने ‘ विंडोज ९८ ‘ कडून गाभा अद्ययावत केला असला , तरी ‘ विंडोज२००० ‘ कडूनही काही पैलू अद्ययावत केले व ‘ बूट इन डॉस मोड ‘ हा पर्याय काढला . 


विंडोज एक्सपी 


‘ विंडोज एक्सपी ‘ खासगी कम्प्युटरवर ( गृह , व्यापारी , मीडिया केंद्रांसह ) चालणारी ओएस आहे . २४ ऑगस्ट२००१ रोजी ती प्रथम कम्प्युटर उत्पादकांना मिळाली . कम्प्युटरवर प्रस्थापित केलेली आणि वापरण्याससोयीस्कर अशी ही विंडोजची सध्याची सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम आहे . ‘ एक्सपी ‘ हे नाव’experience’ याचा शॉर्टफॉर्म आहे . निर्मितीपूर्व काळात तिचे सांकेतिक नाव ‘ व्हिसलर ‘ असे होते . ‘ विंडोजएक्सपी ‘ ची रिटेल विक्री २५ ऑक्टोबर २००१ ला सुरू झाली . जानेवारी २००६ मध्ये ‘ विंडोज एक्सपी ‘ च्या४० कोटीहून अधिक प्रती वापरात होत्या , असे एका आयडीसी विश्लेषकाचा अंदाज आहे . ‘ एक्सपी ‘ नंतर ‘विंडोज व्हिस्टा ‘ व्यावसायिकांना ६ नोव्हेंबर २००६पासून व सामान्य जनतेला ३० जानेवारी २००७ पासूनमिळू लागली . ‘ विंडोज एक्सपी ‘ च्या मूळ निर्मात्याने या प्रणालीची किरकोळ विक्री ३० जून २००८ लाथांबवली . मात्र , मायक्रोसॉफ्टने नवीन संगणकाची जोडणी करणाऱ्यांना ही प्रणाली ३१ जानेवारी २००९ पर्यंतविकली . घरगुती वापरासाठी केलेली विंडोज एक्सपी , होम एडिशन व विंडोज एक्सपी , व्यावसायिक आवृत्तीया दोन्ही आवृत्ती सर्वात जास्त लोकप्रिय होत्या . या व्यावसायिक आवृत्तीत विंडोज सर्व्हर डोमेन्स यासारखीवैशिष्ट्ये होती . विश्लेषकांच्या मते ‘ विंडोज एक्सपी ‘ ही सप्टेंबर २००३ ते जुलै २०११ या काळात जगातलीसर्वांत जास्त वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम होती . 


विंडोज ७ 


आजही ती भारतात सर्वांत जास्त वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम आहे . ‘ विंडोज ७ ‘ च्या प्रकाशनानंतरमात्र ‘ एक्सपी ‘ चा वापर घटत गेला . तिचा सर्वांत जास्त वापर जानेवारी २००७ मध्ये ७६ . १ % होता . सध्यातो २७ . ३ % आहे . 


विंडोज व्हिस्टा 


३० जानेवारी २००७ रोजी ‘ विंडोज व्हिस्टा ‘ चे प्रकाशन करण्यात आले . व्हिस्टामध्ये मायक्रोसॉफ्टने अनेकनवीन वैशिष्ट्यांचा समावेश केला होता पण व्हिस्टाचे वापरकर्ते त्यातील बऱ्याच त्रुटींवर नाखूष होते . ऑक्टोबर२००९ मध्ये विंडोजची नवीन सिस्टम विंडोज ७ काढण्यात आली ज्यामध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज विस्टातीलचुकांचे निरसन केले . २२ ऑक्टोबर २००९ रोजी विंडोज ७ चे प्रकाशन करण्यात आले . २००६ सालीकाढलेल्या विंडोज व्हिस्टा ह्या ऑपरेटिंग सिस्टममधील अनेक त्रुटी मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ मध्ये सुधारल्याआहेत . यात विंडोज साईड बार काढण्यात आला आणि ग्राफिक रिझोल्यूशन वाढविण्यात आले . 


विंडोज ८ 


‘ विंडोज ८ ‘ ही ऑपरेटिंग सिस्टिम २६ अक्टोबर २०१२ रोजी बाजारात आली . ही एक अशी यंत्रणा आहे जीटॅबलेट आणि पीसी दोन्हींसाठी विकसित करण्यात आली आहे . विंडोज ८ बरोबरच सर्फेस टॅबलेटही रिलीज झले .आयपॅड अथवा अँड्रॉइडशी तुलना करता विंडोजने ‘ सर्फेस विंडोज आरटी ‘ व ‘ विंडोज ८ प्रो ‘ या दोन ओएसउपलब्ध करून दिल्या आहेत . यात आपण अँड्रॉइडच्या ‘ प्ले स्टोअर ‘ प्रमाणेच ‘ विंडोज अॅप स्टोअर ‘ मधूनक्लासिक डेस्कटॉप अप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो . पण थोडसा किचकटपणा असल्यामुळे ‘ विंडोज ८ ‘अनेकांच्या पसंतीस उतरले नाही . 


विंडोज ब्ल्यू 


‘ विंडोज ८ ‘ चे अपडेट व्हर्जन म्हणजेच ‘ विंडोज ब्ल्यू ‘. याला ‘ विंडोज ८ . १ ‘ असेही म्हणतात . ही ओएसलवकरच बाजारात येत आहे . ‘ विंडोज ८ ‘ मधील बग्स अथवा लोकांचे आलेले रिव्ह्यूज पाहून हे अपडेट बनवलेगेले आहेत . या अपडेटमध्ये लार्ज आणि स्मॉल लाइव्ह टाइल अॅडजेस्ट करता येतात म्हणजेच स्टार्ट स्क्रीनकस्टमायझेशन अधिक सोपे झाले आहे . मल्टीटास्किंग सोयीस्कर करण्यासाठी ‘ साइड – बाय – साइड ‘ व्ह्यूचापर्याय देण्यात आला आहे . डिवाइस पॅनेलखाली प्ले बटण , इंटरनेट एक्सप्लोअरर ११ , शेअर साइड बारवरस्क्रीन शॉटचे बटण , अशा बराचशा नवीन सुधारणा यात करण्यात आल्या आहेत . याला युजर्सची कशी पसंतीमिळेल , याकडे मायक्रोसॉफ्टचे लक्ष लागून राहिले आहे . 

ADVERTISEMENT
Tags: HistoryMicrosoftWindowsWindows 8
ShareTweetSend
Previous Post

स्मार्ट रिव्ह्य़ू : नोकिया लुमिआ ९२०

Next Post

‘सॅमसंग’, ‘मोझिला’चे नवे ब्राउजर : लवकरच ‘सर्वो’ ब्राउजर लाँच करणार

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Crowdstrike BSOD Windows

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!

July 19, 2024
मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

January 17, 2024
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
Next Post

‘सॅमसंग’, ‘मोझिला’चे नवे ब्राउजर : लवकरच 'सर्वो' ब्राउजर लाँच करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech