MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

‘सोशल नेटवर्किंग’ची दुनिया आभासीच

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 12, 2013
in Social Media
सोशल नेटवर्किंग साइट्स . रोज एकदा तरी व्हिजिटकेल्याशिवाय कुणाचे पानही हलत नसेल , इतके त्याचे महत्त्व . फ्रेंडलिस्ट वाढवण्याची इच्छा आणि चॅटिंगकेल्याशिवाय चैन न पडणे , हे या साइट वापरणाऱ्यांचे वैशिष्ट्य . आताच्या काळात कुणीही या साइट्सचे महत्त्वनाकारणार नाही . अमेरिकेत मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनात ही दुनिया आभासीच असल्याच्या मुद्द्यावरशिक्कामोर्तब करण्यात आले . अण्णा हजारे यांची चळवळ , इजिप्तमधील नागरी चळवळ बऱ्यापैकी यशस्वीहोण्यामागे सोशल नेटवर्किंग साइट्सही कारणीभूत होत्या , असा दावा अनेकांनी केला . या दाव्याला धक्कापोहोचविणारे संशोधन तिथे झाले आहे . कुठलीही संकटकालीन परिस्थिती ( भूकंप , पूर इत्यादी ), मोठ्याप्रमाणावरील नागरी चळवळी यांमध्ये सोशल नेटवर्किंग साइट्स परिणामकारक ठरत नाहीत , असे हे संशोधनसांगते . उलट अशा प्रकारच्या साइट्सचा वापर अपेक्षित मदतकार्याला किंवा चळवळीला मारकच ठरतो , असाही दावा करण्यात आला आहे . 



अमेरिकेतील ‘ डिफेन्स अॅडव्हान्स्ड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी ‘ ने २००९मध्ये हा प्रयोग केला . या प्रयोगातीलनिष्कर्षावरून संशोधकांनी सोशल नेटवर्किंग साइट्सच्या परिणामकारकतेवर भाष्य केले आहे . नेटवर्किंगसाइट्सचा वापर आणि त्याची प्रत्यक्षातील परिणामकारकता या प्रयोगात तपासण्यात आली . साइटच्यावापरामुळे एखाद्या संकटकालीन परिस्थितीत प्रत्यक्ष किती जण मदतीला आले एखादी चळवळ प्रत्यक्षात कितीमोठ्या प्रमाणात फोफावली , हे तपासण्यात आले . त्यासाठी एक अनोखा प्रयोग करण्यात आला . चाळीस हजारडॉलरचे पारितोषिक त्यासाठी ठेवण्यात आले . अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या अशा दहा ठिकाणी ‘ वेदर बलून्स ‘ठेवण्यात आले . कमीत कमी वेळात ते शोधून काढायचे होते . या प्रयोगामध्ये ‘ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफटेक्नॉलॉजी ‘ ( एमआयटी ) विजेती ठरली . त्यांना त्यासाठी नऊ तास लागले . 


विजेत्यांना वृत्तपत्रे , रेडिओ , टीव्ही या पारंपरिक संवादाच्या साधनांशिवाय , केवळ सोशल नेटवर्किंगसाइट्सच्या वापराने हे बलून लवकर शोधता आले असते ; पण तसे झाले नाही . विजेत्या स्पर्धकांकडे केवळसोशल नेटवर्क होते म्हणून ते जिंकले नाहीत , तर त्यांनी ते नेटवर्क परिणामकारकरित्या उपयोगात आणले .त्यांच्या नेटवर्कच्या परिणामकारक उपयोगामध्ये साइट्स फारशा कामी आल्या नाहीत . कामी आले , ते त्यांनीप्रत्यक्ष जोडलेले नेटवर्क आणि ते वापरण्याचे त्यांच्याकडे असलेले कसब . त्यामुळे काही ठराविक परिस्थितीमध्येचसोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर परिणामकारक ठरतो , असा निष्कर्ष अंतिमतः काढण्यात आला . 


सोशल नेटवर्किंग साइट्समुळे नागरी उठावांना चालना मिळते , असा दावा करणाऱ्यांना या संशोधनाने चोखउत्तर दिले आहे . वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास साइट्सचा वापर प्रचारासाठी होऊ शकतो ; पण याप्रचाराचा परिणाम प्रत्यक्षात शंभर टक्के दिसेलच , असे मात्र नाही . 

ADVERTISEMENT
Tags: FacebookNetworkingSocialSocial MediaTwitter
ShareTweetSend
Previous Post

उत्तर एका क्लिकवर :(आस्क अ क्वेश्चन अॅप ) उत्तर देतील ते थेट आयआयटीमधील तज्ज्ञ प्रोफेसर्स

Next Post

अँड्रॉइड अॅपची चलती

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
twitter elon musk

इलॉन मस्कने ट्विटर कंपनी विकत घेतली : ३,३७,००० कोटींचा व्यवहार!

April 26, 2022
Instagram Feed Sort

इंस्टाग्रामवर आवडीच्या पोस्ट्स क्रमाने पहा : Chronological Feed परत उपलब्ध!

March 24, 2022
Next Post

अँड्रॉइड अॅपची चलती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!