MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

सुरक्षितता तुमच्या अकाऊंटची Secure email or facebook accounts

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 8, 2013
in Security
web-security.jpgअनेकवेळा ऑफिसात, सायबर कॅफेमध्ये गेल्यावर जीमेल, फेसबुकवर लॉगइन केले जाते पण लॉग आऊट करण्याचा विसर पडतो. अशावेळी कुणीतरी त्याचा गैरवापर करेल, अशी भिती सदैव वाटत असते. पण तिथे लगेच जाऊन लॉग आऊट करणे शक्य नसते. अशावेळी दुसऱ्या ठिकाणी बसूनही आपण ते लॉग आऊट करू शकतो. त्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही संपुष्टात येते. 


जीमेलच्या विंडोमध्ये उजव्या हाताच्या कोप-यात सर्वात खाली Last account activity अशी एक लिंक असते. त्याखाली दिलेल्या details वर क्लिक केल्यावर Activity on this account अशी एक नवीन विंडो ओपन होते. त्यात यापूर्वी १० वेळा कोणत्या ठिकाणी संबंधित अकाऊंट अॅक्सेस करण्यात आले होते ते ठिकाण, वेळ आणि ब्राऊझर अशी माहिती येते. सध्या कोणकोणत्या ठिकाणी हे अकाऊंट लॉग इन आहे, याचीही विस्तृत माहिती मिळते. उदा. मोबाइलवर लॉग इन असल्यास कंपनीचे नाव, मॉडेल, सॉफ्टवेअर, मोबाइल ऑपरेटर यासारखी माहिती मिळते. कम्प्युटरवरून केले असल्यास ब्राऊझर, आयपी अॅड्रेस हे देखील कळून येते. या विंडोमध्ये वरच्या बाजूला sign out all other sessions या बटनावर क्लिक केल्यावर सध्या सुरू असलेल्या ठिकाणी वगळता इतर सर्व ठिकाणी लॉग आऊट करता येते. 


फेसबुकमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे. फेसबुकच्या विंडोमध्ये उजव्या हाताला सेटींग्जचा टॅब असतो. त्यावर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होते. त्यात security च्या टॅबवर क्लिक केल्यावर Active Sessions म्हणून एक पर्याय समोर येतो. त्यामध्ये सध्या कोणकोणत्या ठिकाणी तुमचे फेसबुक अकाऊंट लॉग इन आहे, याची माहिती मिळते. इतरत्र कुठे जर ते अकाऊंट लॉग इन असेल तर end activity या बटनावर क्लिक करून ते लॉग आऊट करता येईल. 


अनेक वेळा काही वेबसाइटवर लॉग इन करण्यासाठी मेल आयडी द्यावा लागतो. त्यानंतर मग त्याठिकाणाहून स्पॅम मेलचा मारा सुरू होतो. त्यामुळे इनबॉक्स चेक करण्याचा कंटाळा येतो. अशावेळी बनावट इमेल आयडी हाताशी असेल तर बराच त्रास वाचतो. हा इमेल आयडी तयार करणे अगदीच सोपे काम आहे. आऊटलूक मेलमध्ये उजव्या हाताला वरच्या बाजूला सेटींग्ज ऑप्शन आहे. त्यात More mail settings > Managing your account > Your email accounts या मार्गाने गेल्यावर Create an Outlook alias हा पर्याय दिसेल. त्याठिकाणी या बनावट आयडीसाठी फोल्डर तयार होईल. या आयडीवरून तुम्हाला इमेलही पाठवता येईल. याहूमध्येही उजव्या हाताला वरच्या बाजूला असलेल्या सेटींगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर Mail optionsनंतर Disposable addresses वर क्लिक करून base name तयार करता येते. याठिकाणीही बनावट फोल्डर तयार करून त्यात सर्व नकोसे मेल जमा होतात.

Related keywords : how to secure email or facebook accounts

ADVERTISEMENT
Tags: EmailFacebookSecurity
ShareTweetSend
Previous Post

सहजसोपे करा विंडोज ८

Next Post

टेकमय सुट्टी

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Faceeook Reels Earn Money

Reels आता फेसबुकवरही उपलब्ध : पैसेसुद्धा कमावता येणार!

February 23, 2022
Facebook Users Dropped

फेसबुकचे यूजर्स प्रथमच कमी झाले : मेटाचे शेयर २०% कोसळले!

February 3, 2022
Facebook Meta

फेसबुकचं नवं नाव मेटा (Meta) : मार्क झकरबर्गकडून नवी कंपनी जाहीर!

October 29, 2021
Next Post

टेकमय सुट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
Amazon Prime Day India

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

July 22, 2022
Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!