MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

आयबीएमने बनवला नॅनो चित्रपट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 27, 2013
in News
चित्रपट आपण सध्या मोठय़ा पडद्यावर पाहणे पसंत करतो, परंतु आता चित्रपट अगदी सूक्ष्म म्हणजे रेणवीय पातळीवर पाहू शकणार आहोत. आयबीएमने असा दावा केला आहे, की त्यांनी अत्यंत सूक्ष्म पातळीवर चित्रपट  तयार केला आहे. हा चित्रपट म्हणजे एक मिनिटाची व्हिडिओ आहे. यात कार्बन मोनॉक्साईडचे रेणू फेररचना करून मुलगा नाचतो आहे, चेंडू फेकतो आहे, असे दृश्य यात दिसते आहे. यात प्रत्येक फ्रेम ही ४५ बाय २५ नॅनोमीटर इतक्या सूक्ष्म आकारातील आहे. 
ibm made nano cinemaएका इंचात २५ दशलक्ष नॅनोमीटर बसतात. या छोटय़ाशा व्हिडिओत संगीताची जोडही आहे. या नॅनो चित्रपटाचे नाव आहे, ‘अ बॉय अँड हिज अ‍ॅटम’. या व्हिडीओत अणूंच्या हालचालींचा वापर केला आहे. हे तंत्र पूर्वीही वापरण्यात आले असले तरी एखादी गोष्ट व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यासाठी त्याचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे, असा दावा, आयबीएमचे मुख्य वैज्ञानिक अ‍ॅंड्रस हेनरिच यांनी केला आहे. आण्विक पातळीवरचा हा नॅनो चित्रपट एक गमतीदार अनुभव आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या जेमी पॅनस यांनी सांगितले की, जगातील सर्वात लहान स्टॉप मोशन फिल्म म्हणून आम्ही या व्हिडीओला मान्यता दिली आहे.
या वर्षांच्या सुरुवातीला हा छोटा चित्रपट/ व्हिडिओची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी आयबीएमने स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोपचा वापर केला आहे. कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे हा मायक्रोस्कोप आहे. या सूक्ष्मदर्शकाने एखादा पृष्ठभाग १० कोटी पट मोठा करून दाखवला जातो. हा सूक्ष्मदर्शक -२६६ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाला काम करतो. त्यामुळे अणूंना स्थानबद्ध करता येते किंवा काक्ष तपमानाला ते फिरू शकतात. 
तांब्याच्या पृष्ठभागासमवेत वापरलेली अतिशय सूक्ष्म सुई नियंत्रित करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करण्यात आला. १ नॅनोमीटर इतक्या अंतरावर ही सुई कार्बन मोनॉक्साईडच्या रेणूंना खेचू लागली व पृष्ठ भागाच्या विशिष्ट ठिकाणी त्यांना आणू लागली. या चित्रपटात अंकांसाठी जे बिंदू वापरले आहेत, ते प्रत्यक्षात ऑक्सिजनचे अणू आहेत.
वैज्ञानिकांनी या चित्रपटात २४२ स्थिर प्रतिमा वापरून २४२ फ्रेम्स तयार केल्या आहेत.’माहितीचे डोंगर उभे राहत आहेत, त्याचा वापर वाढत आहे तसे माहिती साठवण्याचे मार्ग बदलत आहेत. हा मार्ग, अर्थात आण्विक पातळीवर माहिती साठवण्याचा आहे. ‘नॅनो’ चित्रपट हा त्याचाच आविष्कार आहे.
हा चित्रपट खालील वेबसाइटवर आहे.  (http://bit.ly/17ZmHIt )
Loksatta
ADVERTISEMENT
Tags: FilmsIBMMoviesNanoVideos
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंग गॅलेक्सी नोट ५१०

Next Post

पॅनासॉनिकचे स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

SSD द्वारे जुन्या लॅपटॉपला बनवा सुपरफास्ट!

SSD द्वारे जुन्या लॅपटॉपला बनवा सुपरफास्ट!

September 18, 2021
नेटफ्लिक्सवर यावर्षी ४१ नवे टायटल्स : चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, इ.

नेटफ्लिक्सवर यावर्षी ४१ नवे टायटल्स : चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, इ.

March 5, 2021
नवा व्हिडिओ : Samsung Galaxy F41 ची ओळख

नवा व्हिडिओ : Samsung Galaxy F41 ची ओळख

November 22, 2020
गूगलवर ‘thanos’ सर्च करा आणि पहा गंमत!

गूगलवर ‘thanos’ सर्च करा आणि पहा गंमत!

April 26, 2019
Next Post

पॅनासॉनिकचे स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!