सहजसोपे करा विंडोज ८

windows8.jpgआजकाल नवा डेस्कटॉप पीसी किंवा नोटबुक घेतल्यावर ‘विंडोज ८’ ही ऑपरेटिंग सिस्टिम त्यावर आधीच लोड असते. ‘विंडोज सेव्हन’, ‘व्हिस्टा’, ‘एक्स्पी’ या ऑपरेटिंग सिस्टीमपेक्षा ही नवी सिस्टीम खूप वेगळी आहे. यात सध्या स्टार्ट बटन नाही. मेन्यू हा पूर्णपणे वेगळा आहे. पण यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. ही सिस्टीम काहीशी कस्टमाइज करता येऊ शकते. 



पीसी शटडाऊन करण्याची पद्धतही प्रथमर्शनी लांबलचक वाटते. ‘विंडोज ८’ पीसीवरील चार्म्स मेन्यूवर पहिल्यांदा सेटिंग्जवर क्लिक केल्यावर त्यात पॉवरवर क्लिक केल्यानंतर अखेरीस शटडाऊनचा पर्याय निवडणे हे वेळखाऊ वाटू शकते. पण, ही एवढी मोठी प्रक्रिया करण्याऐवजी टास्कबारवर शट डाऊनचा शॉर्टकट तयार करता येतो. डेस्कटॉपवर असताना राइट क्लिक केल्यानंतर मेन्यूमधून नवा शॉर्टकट असा पर्याय निवडावा आणि त्यानंतर एक विंडो ओपन होईल. लोकेशन फिल्डवर / s /t 0 शटडाऊन टाइप करावे. त्यानंतर शॉर्टकटसाठी नाव तयार करावे. तुम्ही याला शटडाऊन किंवा अन्य कोणतेही नाव देऊ शकता. शॉर्टकटचा आयकॉन सेव्ह करावा आणि त्यासाठी नवा आयकॉन द्यावा. या शॉर्टकटवर क्लिकवरून सिस्टिम बंद करता येते. 


डेस्कटॉपवर थेट बूट करण्याचा पर्यायही यात आहे. डेस्कटॉपवर जाण्यापूर्वी विंडोज ८वर बूट प्रोसेंसिंग होत असताना पासवर्ड मागितला जातो. मात्र, ही प्रक्रिया टाळता येऊ शकते. कम्प्युटर सुरू केल्यावर नेटप्लीज टाइप करून एंटर केल्यावर हे जमू शकते. यूजर अकाउंट सिलेक्ट केल्यावर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांवरून थेट डेस्कटॉपवर जाता येते. ‘विंडोज ८’ ला लॉकस्क्रीनची सुविधा आहे. मात्र, या सुविधेची गरज वाटत नाही. लॉकस्क्रीनचा पर्याय डिसेबल्ड करण्यासाठी डेस्कटॉपवर असताना विंडोज की+आर प्रेस करावे. त्यानंतर रन विंडोमध्ये gpedit.msc टाइप करावे आणि एंटर प्रेस करावे. यामुळे लोकल ग्रुप पॉलिसी एडिटर विंडो उघडेल. त्यानंतर कम्प्युटर कॉन्फिगरेशन> अॅडमिनिस्ट्रेटिव्ह टेम्प्लेट्स> कंट्रोल पॅनल> अशा मार्गाने पर्सनलायझेशनमध्ये जावे. उजव्या बाजूच्या पॅनलमध्ये यूजर अकाउंटवर क्लिक केल्यावर पर्सनलायझेशन आणि डू नॉट डिस्प्ले द लॉक स्क्रीनच्या पर्यायानंतर एनेबल्डचा पर्याय स्वीकारावा. जर तुमच्याकडे ‘विंडोज ८’ चे प्रोफेशनल व्हर्जन नसेल तर, रजिस्ट्री अपडेट करावी लागणार आहे. संबंधित रजिस्ट्री डाऊनलोड करून फाइल अनझिप करावी आणि डिसेबल लॉकस्क्रीनवर डबलक्लिक करावे. यासाठी  >>>>> howtogeek <<<<<<ही लिंक पाहावी. 

Related Keywords- : microsoft, windows, make easy, how to disable start screen in windows 8

Exit mobile version