MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

‘गुगल ग्लास’ घातक! खासगी जीवनामध्ये हस्तक्षेप होण्याची भीती

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 9, 2013
in Security, Wearables
ADVERTISEMENT
google-glass.jpgवेगवेगळ्या ‘ थीम्स ‘ नी नेटिझन्सना कायम आकर्षित करणाऱ्या ‘ गुगल ‘ ने ‘ गुगल ग्लास ‘ च्या माध्यमातून इंटरनेटच्या जमान्यामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे. आपल्या कामावरील लक्ष विचलित होऊ न देता, स्मार्टफोनची मजा घेण्यासाठी हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला फोटो काढता येईल, व्हिडीओ पाहता येईल, रेकॉर्ड करता येईल, एखादे ठिकाणी कसे जायचे हे शोधता येईल, गुगल सर्च प्रमाणे माहिती शोधता येईल, एखादे वाक्य भाषांतरित करता येईल वगैरे वगैरे. अशी खूप काही कामे करणाऱ्या उपकरणामुळे मात्र आपल्या खासगी जीवनामध्ये हस्तक्षेप होण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

हे उपकरण आपल्या डोळ्यांच्या एका कोपऱ्यामध्ये, चष्म्याप्रमाणे स्मार्टफोनसारखे बसवता येते. 

‘ गुगल ग्लास ‘ च्या निर्मितीमागील हेतू स्पष्ट करताना, ‘ गुगल ‘ च्या संस्थापकांपैकी एक असणारे सर्जी ब्रिन म्हणतात, ‘ आपण आपल्या स्मार्टफोनकडे पाहत, मानखाली घालून फिरत असतो. अशा वेळी आपली मान आणि हात दोन्हीही मोकळे कशापद्धतीने करता येतील? असा विचार आम्ही केला. ‘ एकूणच स्मार्टफोनचा वापर वाढत असताना, तो अधिकाधिक सोप्या पद्धतीने वापरण्यासाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘ शेवर्ले ‘ ने मागील महिन्यात एक नवे उपकरण आणले असून, त्यामध्ये एक महिला गाडी चालवत असतानाही केवळ आवाजाच्या माध्यमातून संदेश वाचताना दाखविली आहे. तंत्रज्ञान विश्वातील या नव्या ‘ अॅप्रोच ‘ मधून ‘ गुगल ग्लास ‘ आपल्यासमोर आला आहे. तसेच, एखादा नवा संदेश आल्यानंतर ‘ गुगल ग्लास ‘ मधून एखादा संदेश लुकलुकणार नसल्यामुळे आपले लक्ष विचलितही होणार नाही. केवळ छोटासा बीप वाजेल आणि संदेश आल्याची सूचना आपल्याला मिळेल. 

‘ गुगल ग्लास ‘ किंवा अशा प्रकारची उपकरणे आपल्या सध्याच्या वेगवान आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आपल्या कामावर, परिसरातील घडामोडींवर पूर्ण लक्ष ठेऊन असतानाच, स्मार्टफोनच्याही संपर्कात राहणे यामुळे शक्य होणार आहे. ‘ गुगल ग्लास ‘ मुळे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याच्या किंवा लक्ष देण्याच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही ‘ गुगल ‘ कडून करण्यात आला आहे. 

मुळातच एखादी गोष्ट पाहणे आणि त्याकडे लक्ष देणे, या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे माणसाचे लक्ष विचलित न होऊ देता, माणसाची विचार करण्याची पद्धत आणि मेंदूतील प्रक्रिया यांचा विचार करूनच हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. त्यामुळेच हे उपकरण अत्यंत सुरक्षित आणि क्रांतिकारी असल्याचेही ‘ गुगल’ कडून सांगण्यात आले आहे. 

मात्र, या नव्या उपकरणामुळे काही तज्ज्ञांनीही धडकी भरवली आहे. यामुळे खासगी जीवनामध्ये हस्तक्षेप होण्याची भीती व्यक्त होत आहे, आपली माहिती रेकॉर्ड केले जाण्याचा धोकाही काही जणांनी व्यक्त केला आहे. आपल्या डोळ्यांच्या एका कोपऱ्यामध्ये स्मार्टफोनसारखे उपकरण असणे आणि त्याच्या मदतीने व्हर्चुअल विश्वाचा आनंद घेणे, खूपच आनंददायी असले तरीसुद्धा ही बाब मानसिकदृष्टीनेही धोकादायक असू शकते, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

ऑनलाइन डायरी 

अनेकांना इंटरनेटवर वेगवेगळे पर्याय ट्राय करण्याची सवय असते. त्यांच्यासाठी diary.com/ ही वेबसाइट वेगळी काहीतरी ठरू शकते. याठिकाणी ऑनलाइन डायरी बनविण्याचा पर्याय उपलब्ध आहे.


Related Keywords  :
google glass
dangers of google glass
online diary

Tags: Google GlassPrivacyWarWebsites
ShareTweetSend
Previous Post

भविष्यातला कम्प्युटर मनगटावरच’ ‘अॅपल ‘ कडून २०१४मध्ये ‘आयवॉच’?

Next Post

अतुल चिटणीस : ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple Stops Products Russia

ॲपलने रशियात उत्पादनांची विक्री थांबवली : ॲप स्टोअर, ॲपल पे, मॅप्सवरही निर्बंध!

March 2, 2022
WhatsApp Resource Hub

व्हॉट्सॲप Safety in India : यूजर्सच्या ऑनलाइन सुरक्षा आणि जागृतीसाठी मदतकेंद्र

February 22, 2022
TikTok Most Popular Domain

गूगलला मागे टाकत टिकटॉक बनली सर्वात लोकप्रिय वेबसाइट!

December 23, 2021
१५ मेपासून व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी लागू होणार : पुढे काय ?

१५ मेपासून व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी लागू होणार : पुढे काय ?

May 14, 2021
Next Post

अतुल चिटणीस : ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!