जगातील सर्वांत महागडा व्हिडिओ गेम ग्रँड थेफ्ट ऑटो -5 बाजारात सादर

जगातील सर्वांत महागडा व्हिडिओ गेम ग्रँड थेफ्ट ऑटो -5 मंगळवारी लाँच करण्यात आला. ब्रिटिश कंपनी रॉकस्टार गेमिंगने तो तयार केला असून यावर सुमारे 1704 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2008 मध्ये जीटीए-4 लाँच झाला होता.

गेमच्या अडीच कोटी कॉपीज विकल्या जातील, असा अंदाज असून कंपनीला 10 हजार कोटींचा नफा होण्याची आशा आहे. हा गेम एक्सबॉक्स 360 किंवा प्लेस्टेशन गेमिंग कन्सोलवर खेळता येईल. भारतात स्टँडर्ड आवृत्तीची 3, कलेक्टर आवृत्तीची किंमत 4 हजार रुपये असेल.
मुंबईतील वाशीमध्ये इनऑर्बिट मॉलमध्ये या गेमची विक्री सुरू झाली आहे.
It’s Biggest Hit game Ever Must Play : CNET
Exit mobile version