याहू आणखी नव्या रूपात

Yahooगेल्या काही काळात याहूने अनेक नवनवे प्रयोग केले आहेत. त्यात आणखी पुढचे पाऊल टाकत १६ व्या वाढदिवशी याहूने नवा लूक , अधिक स्टोरेज स्पेस , थीम्स आदी नव्या सुविधा सादर केल्या आहेत. डेस्कटॉप व्हर्जनमध्ये दिसणारे सर्व बदल लवकरच अँड्रॉइड ,आयफोन आणि विंडोज ८ व्हर्जनमध्येही दिसणार आहे. या सर्व सुविधांमुळे नवा लूक काही अंशी जीमेल सारखा झाल्याचा आरोपही काही तंत्रज्ञ करत आहेत. 


इनबॉक्सला थीम 


याहूच्या नव्या लूकमध्ये इनबॉक्सला रंग किंवा चित्रांची थीम देण्यात आली आहे. यासाठी फ्लिकरमधून चित्र निवडण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. एकदा निवडलेली थीम मोबाइल आणि इतर व्हर्जनवरही कायम राहणार आहे. याबरोबरच इनबॉक्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. इनबॉक्सच्या डाव्या बाजूला साइडबार देण्यात आला आहे. हा साइडबार कोलॅप्स आणि एक्स्पांड होऊ शकते. एक्स्पांड झाल्यावर इनबॉक्स , सेंट , ड्राफ्ट, ट्रॅश यासारखे विभाग दिसू शकतील , तर कोलॅप्स केल्यावर केवळ त्यांचे लोगो दिसतील. नव्या लूकमध्ये इमेल ओपन न करताही ट्रॅशमध्ये टाकण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याचबरोबर या फोल्डरमधील मेल डाव्या बाजूच्या पट्टीत दिसणार असून त्यावर क्लिक केल्यावर लगेच बाजूला पूर्ण मेल दिसतो. यात मेलमध्ये आलेल्या वर्ड , पीडीएफ , एक्सेल फाइल ओपन कराव्या न लागता त्या ठिकाणीच दिसणार आहेत. याबरोबरच नवीन इमेल टाइप करताना सीसी आणि बीसीसी लगेच दिसणार नाहीत. गरज असल्यास सीसीवर क्लिक केल्यावर सीसी त्यानंतर बीसीसीवर क्लिक बीसीसी दिसू शकेल. यामध्ये बीसीसी वापरताना सीसी हाइड करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. या सर्व माध्यमातून युजरचा एकेक क्लिक आणि पर्यायाने वेळ वाचविण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. मेलला रिप्लाय करण्यासाठीही आता जीमेलप्रमाणे लगेच त्याखालीच सोय देण्यात आली आहे. त्यात पूर्वीच्या मेलमधील संदेश न दिसण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 


१ टीबी स्टोरेज 


सर्वात महत्त्वाचे म्हणजे याहूने सर्वसामान्य युजरसाठीची स्टोरेज स्पेसही १ टीबीपर्यंत वाढविली आहे. याहूच्या युजरचा सरासरी वापर पाहता ५०० केबी ते १ एमबीची अॅटॅचमेंट वापरणारे आता ६ हजार वर्षांपर्यंतचे मेल साठवून ठेवू शकतील , असा कंपनीचा दावा आहे. पूर्वी ही सुविधा मेल प्लस अंतर्गत मिळत होती. आता सर्वांना ती मोफत मिळणार आहे. यामध्ये डिस्पोजेबल इमेल , पीओपी इमेल आणि मेल फॉरवर्डिंगसारखे पर्याय मिळणार आहेत. मेल प्लसचे युजर आता वर्षाला १९.९९ डॉलर मोजून जाहिरातमुक्त याहूचा आस्वाद घेऊ शकतील. नव्या युजरना मात्र त्यासाठी ४९.९९ डॉलर मोजावे लागणार आहेत. 

incoming search terms :
yahoo changes its appearance and theme design overall

Exit mobile version