MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

सोशल साइट्सची नवी फाइट : ट्विटर लिंक्डइन यु ट्यूब इन्स्टाग्राम, पिन्ट्रेस्ट व्हॉट्सअॅप, बीबीएम, लाईन, वी-चॅट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 13, 2013
in Social Media
एकेकाळी फेसबुकवर पडीक असणारा बंड्या आता इन्स्टाग्राम नी ट्विटरशिवाय बात करत नाही. अट्टल एफबीप्रेमी, कट्ट्यावरचा झुकेरबर्ग अशा अनेक नावांनी फेमस असलेल्या बबलूसमोर आता टम्बलर, फोर स्क्वेअरचे ऑप्शन्स तयार झालेत. आबालवृद्धांमध्ये फेमस असणारं एफबी हळूहळू मागे पडतंय! काय चाललंय हे सगळं? काय कारणं आहेत याची? ट्विटर तर माहितीय… पण इन्स्टाग्राम, टम्बलर वगैरे काय भानगड आहे? या स्पेसिफाइड साइट्सनी नेटविश्वात असा काय गोंधळ घातलाय?… सांगतायत स्वप्निल घंगाळे आणि मृण्मयी नातू. 

अंदाजे दहा एक वर्षापूर्वी ऑर्कूटने तरुणाईला अगदी भुरळच घातली होती. ऑर्कुटवर असणं म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं झाल्याचं वयात आल्याचं लक्षण वाटायचं. मात्र २००५ उजाडलं आणि चित्रच बदललं. फेसबुकने सोशल साइट्सच्या मार्केटमध्ये उडी घेतली आणि बघता बघता ऑर्कुटवरचे तरुण फेसबुकावरच पडीक राहू लागले. आकर्षक इंटरफेस, उत्तम नॅव्हिगेशनच्या जोरावर फेसबुकने ऑर्कुटला मागे टाकलं. यानंतर फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलने ‘ जी प्लस ‘ सेवा सुरु केली. पण त्याच्या थोड्याशा वेगळ्या लूकमुळे ती तरुणांच्या पचनी पडू शकली नाही. पण फेसबुकला टक्कर देणार एक तगडं आव्हान सध्या उभं राहू पाहतंय. ते म्हणजे, कंटेंटबेस्ड सोशल नेटवर्किंग साइट्स. फेसबुकवर पडीक असणारी तरुणाई हल्ली हळूहळू या साइटकडे वळू लागलीय. 

सोशल नेटवर्किंग वापरणारे दोन प्रकारचे युझर्स असतात. नेटिव्ह युझर्स आणि मायग्रेटेड युझर्स. नेटिव्ह म्हणजे आजची तरुणाई, ज्यांच्या नेटवर्किंगमधल्या सुरुवातीच्या काळातच इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगचं फॅड उदयास आलं. तर मायग्रेटेड युझर्स म्हणजे जुनी पिढी, ज्यांनी कम्प्युटरची मुळाक्षरं गिरवली आणि हळूहळू या साइट्सपर्यंत येऊन पोहोचले. या पिढीने जुन्या तंत्रज्ञानाला, जुन्या भल्यामोठ्या कम्प्युटरना बाय बाय करत नव्या टेक्नॉलॉजीला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. पण काळ बदलला आणि सोशल साइट्सचं विश्वही… एककाळ एफबीवरचे भलेमोठे स्टेटस अपडेट, त्यावर शेअर होणारे फोटो, इतरांचे स्टेटस आणि फेसबुकाच्या भिंतीच्या भिंती भरून टाकणारे अपडेट्स हे सगळं म्हणजे फेसबुककरांच्या सुबत्तेचं प्रतिक होतं. ज्याची फ्रेंडलिस्ट मोठी तो मोठा असा एक समज होता. पण तरुण आणि उत्साही नेटिव्ह युझर्सना आता या खिचडीचा कंटाळा येऊ लागला होता. त्यांना काहीतरी स्पेसिफिक हवं होतं. म्हणूनच इन्स्टाग्राम, यू ट्यूब, टम्बलर, पिंट्रेस्ट अशा स्पेसिफाइड किंवा निश साइट्सकडे ते वळू लागले. अर्थात सध्या हा ट्रेंड कमी दिसतोय. पण हे लोण पसरत जाणार आणि फेसबुकावरची गर्दी ओसरणार यात शंका नाही. 

आठ वर्षापूर्वी सुरु झालेल्या फेसबुकचा इंटरफेस खूपच सोप्पा, युझर फ्रेण्डली आणि संवादात्मक होता. त्यामुळे नवख्या युझरलाही ते वापरण्यात अडचण येत नाही. लोकांना आपल्या इंटरफेसचा कंटाळा येऊ नये म्हणून एफबीने अनेक बदल केले. उदा. टाइमलाइन, फेसबुक मेसेंजर, टॅग कंट्रोल. इ. पण सध्या फेसबुकवर झालेली युझर्सची दाटी, पेजेसची अमर्याद संख्या, तोचतोपणा यामुळे एफबी कंटाळवाणं होऊ लागलंय. दुसरं म्हणजे एफबीच्या या वाढत्या युझरमध्ये घरच्याच अनेक नातेवाईकांचा, आप्तांचा समावेश झालाय. फ्रेंडलिस्टमध्ये ही सगळी ज्येष्ठ मंडळी आल्याने तरुणांना त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची प्रायव्हसी यावर बंधनं आल्यासारखं वाटतंय. शिवाय लाइक केलेल्या नको नको त्या पेजच्या अपडेट्समुळे एफबी वॉल इतकी भरून जाते की ज्यांच्याशी खरंच कनेक्ट राहायचंय ते या महाजालात कुठेतरी हरवूनच जातात. एफबीवरुन तुम्ही बातम्या, फोटो, व्हिडिओ, नोट्स, लोकेशन्स काय वाट्टेल ते शेअर करू शकता. शिवाय फॅन पेजेस, ग्रूप्स, फन गेम्स, एफबी अॅप्स आहेतच. यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्हीसाठी, ‘ एफबी वॉझ द बेस्ट ऑप्शन ‘. पण आजच्या तरुणाईला ही भेसळ नकोय. म्हणूनच व्हिडिओसाठी यू ट्यूब, लोकेशन्स शेअरिंगसाठी फोर स्क्वेअर इ. पर्याय त्यांना हवेत. 
पण आजच्या तरुणाईला ही भेसळ नकोय. म्हणूनच व्हिडिओसाठी यू ट्यूब, लोकेशन्स शेअरिंगसाठी फोर स्क्वेअर इ. पर्याय त्यांना हवेत. हा अर्थात भारतात हा ट्रेंड अगदीच प्राथमिक पातळीवर आहे. म्हणजे आज कम्प्युटरच्या जगात थोड्याशा अप्रगत किंवा नवख्या असलेल्या ‌मुलाला आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी एफबी फॅन पेज हा पर्याय योग्य वाटत असेल पण अस्सल नेटकर मात्र आपल्या विषयीची एखादी बातमी शेअर करण्यासाठी ट्विटर, फोटोसाठी इन्स्टाग्राम, लोकेशनसाठी आणखी एखाद्या साइटचा आधार घेईल. 

नवं का हवं? 

एफबीसारख्या मासिफाइड प्लॅटफॉर्मकडून तरुणाई क्लासिक प्लॅटफॉर्मकडे वळतेय. माहितीच्या महासागरापेक्षा त्यांना फक्त हवी ती माहिती हवीय. ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन या साइटचे वेगळे आणि आकर्षक फीचर्स, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी, ताजा लुक. यामुळे तरुण तिथे वळतायत. शिवाय अजून तिथे युझर्सची गर्दीही झालेली नाही. त्यामुळे तिथे प्रायव्हसीलाही बराच स्कोप दिसतोय. 

मोबाईल मेसेजचा अंत? 

मेसेज पॅक्सची जागा आता इंटरनेट पॅक्सने घेतली आहे. या दिवाळीत अनेक कंपन्यांनी परंपरेनुसार येणारे मेसेज रेट हाईकचे अॅलर्ट मेसेज न पाठवणं हाच मोबाईल मेसेजिंगला उतरती कळा लागल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. अनेक फ्री एसएमएस अॅप्लिकेशन, फ्री मेसेजिंग साईट्समुळे पैसे खर्च करुन मेसेजे पाठवण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. कंपन्यांनीही मेसेजिंगचे मरण पाहून इंटरनेट प्लॅन्समध्ये भरमसाठ वाढ करत आपण तोट्यात जाणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. 

काय आहे या साइट्सचं भविष्य? 

सोशल सा‌इट्सचा मूळ् उद्देश नवे मित्र जोडणं हा होता. पण आता त्याच्याकडे बिझनेस म्हणूनही पाहिलं जातंय. भविष्यात कोणत्याही उत्पादनाच्या प्रमोशनसाठी हाच मीडिया कामी येणार आहे. एफबी आणि ट्विटर वापरणाऱ्यांच्या आकडेवारीत आपण जगातल्या टॉप ५ देशांमध्ये आहोत. जी मध्यम वयातली लोकं या साइट्सपासून लांब आहेत तीही त्याच्या जवळ येतील. त्यामुळे सोशल साइट युझर्सची संख्या चिकार वाढेल. आगामी काळात ट्विटरचं वर्चस्व दिसून येईल. २०१४च्या मध्यावर व्हॉटसअॅप अधिक प्रचलित होईल. त्याचा इंटरफेस बदलला की खरी मजा येईल.  : —— आदित्य गुप्ता, संस्थापक, सोशल समोसा 

कनेक्ट राहण्याचा नवा फंडा 

फेसबुक जरी तरुणाईला कंटाळवाणं वाटू लागलं असेल तरीही लोकांना जवळ आणण्यात त्याचा मोठा वाटा आहे. अनेकांनी आपले जुने मित्र- नातेवाईक यांना फेसबुकवरुनच शोधून काढलं. रोज भेटणं होत नसेल तरी एफबी अपडेट्स पाहून आजकाल लोकं एकमेकांची खुशाली समजून घेतात. 
तीच कथा व्हॉट्सअॅपची. ‘ काय रे सारखा मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेला असतोस? ‘ असं ओरडलं जाणं हा तुमच्याकडे व्हॉटसअॅप असल्याचा मोठा पुरावा होता. पण व्हॉट्सअॅपवरच्या ग्रूप्सच्या सुविधेमुळे आता कुटुंबही कनेक्टेड होऊ लागलीत. फक्त मित्रांचेच नव्हे तर सख्खी भावंडं, मावस, चुलत भावंड यांचे ग्रूप्स तयार होऊ लागलेत. नातेवाईकांचे ग्रूप्स तयार होतायत. आपण काय करतोय?कुठे आहोत? आपल्या आयुष्यात काय नवीन घडामोडी आहेत हे सगळं व्हॉट्सअॅपच्या एका मेसेजवरुन सगळ्यांना कळू शकतं. त्यामुळे या व्हर्च्युअल जगाचे असे काही रिअल फायदेही आहेतच. 

ट्विटर अप, फेसबुक डाऊन 

भविष्यात फेसबुकचा मीटर भारतात डाऊन होऊन ट्विटर उंच भरारी घेईल असं वर्तवलं जातंय. तज्ञांच्या मते २०१४ वर्ष हे ट्विटरचं ठरेल. तरुणाई ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या दिशेने वळायला सुरुवात झाली आहे. तर कस्टमर सर्व्हिसच्या माध्यमातून बघायला गेलो तर सोशल मीडियाच्या विश्वात ट्विटरचं वर्चस्व नाकारता येणार नाही. अनेकांना बिझनेसच्या दृष्टीकोनातून हे शिकणं भाग पडेल. याचं मुख्य कारण म्हणजे अनेक मोठ-मोठ्या ब्रँडसनी प्रोमोशनल अॅक्टिव्हिटीजसाठी ट्विटरचा दणक्यात वापर करायला सुरुवात केली आहे. छोट्या उद्योजकांनाही याचा खूप फायदा होतोय. 
स्नॅपचॅटचा भन्नाट फंडा 

हे सध्याचं सगळ्यात हॉट आणि ट्रेंडी मोबाईल अॅप्लिकेशन आहे. यामध्ये तुम्ही स्नॅप्स म्हणजेच टेक्स्ट, फोटो किंवा शॉर्ट मेसेजेस पाठवल्यावर ते समोरच्याने वाचल्यावर काही सेकंदांच्या आतच आपोआप डिलीट होतात. क्षणार्धात गायब होणाऱ्या या मेसेजच्या नाविन्याने प्रायव्हसीचा प्रश्न सुटतो असं अनेकांचं म्हणणं आहे. सध्या अनेक दशलक्ष लोकं याचा उपयोग करत असून भविष्यात याला आणखीन मागणी येण्याची शक्यता आहे. 

गुगल प्लसची गुगली  :—–   नाही नाही म्हणताही सध्या गुगल प्लसचे तब्बल ५४० दशलक्ष युझर्स आहेत.                                      त्यामुळे फेसबुकनंतर त्या तोडीचा पर्याय म्हणून गुगल प्लसकडेच सगळं लक्ष आहे. गुगलच्या नानाविध अप्लिकेशन्सचं पाठबळ असल्याने हे माध्यम सतत स्वतःमध्ये बदल आणत आहे आणि पुढेही आणेल यात काही शंका नाही. तरुणाईमध्ये गुगल प्लसचा माहौल थंड असला तरी पुढे हे लोकप्रिय होण्याची दाट शक्यता सॉफ्टवेअर डेव्हलपर्सकडून वर्तवली जाते. 

फोटुवाले  : —-दहा वाक्यांतून तुम्ही जे सांगू शकणार नाही ते एका चित्रातून सांगता येतं असं म्हणतात.                           इन्स्टाग्रामनेही नेमकं हेच केलंय. स्टेटस, वगैरे भानगडी न ठेवता ते फक्त आणि फक्त फोटोज शेअरिंगवर भर देतात. या फोटोजवरचं क्रिएटिव्ह डिस्कशनही इथे होत असल्याने माहिती आणि ज्ञानही इथे मिळतं. 

बातम्या आणि ब्लॉगसाठी …       : ट्विटर 
नोकरी व व्यवसायाच्या संधींसाठी : लिंक्डइन 
व्हिडीओजसाठी                       : यु ट्यूब, Vimeo, metacafe, dailymotion 
फोटोजसाठी                           : इन्स्टाग्राम, पिन्ट्रेस्ट (Pinterest)
लेखसाठी                               : ब्लॉग्ज साईट (Blogger, WordPress)  
गाण्यांसाठी                            : iTunes, मायस्पेस 
शॉर्ट व प्रायव्हेट मेसेज               :व्हॉट्सअॅप, बीबीएम, लाईन, वी-चॅट 
ADVERTISEMENT
Tags: FacebookGoogle PlusInstagramMySpaceNetworkingSocialTwitterWhatsAppYouTube
ShareTweetSend
Previous Post

अ‍ॅपलची’हवा’ई क्रांती : अ‍ॅपल आयपॅड एअर

Next Post

व्हॉट्स अॅपची दिवाळी, एसएमएस कंपन्यांचं दिवाळं

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
WhatsApp HD Photos

व्हॉट्सॲपवर फोटोज आता HD क्वालिटीमध्ये पाठवता येणार!

August 18, 2023
ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

July 24, 2023
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
Next Post

व्हॉट्स अॅपची दिवाळी, एसएमएस कंपन्यांचं दिवाळं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!