वाचा कोणी आणि कसे बनवले अ‍ॅन्ड्राइड

आज अ‍ॅन्ड्राइड हा शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कित्येक स्मार्टफोन्स आज त्यांच्या ब्रांडच्या नावाने नाही तर अ‍ॅन्ड्राइड नावाने ओळखले जातात. 2007 पूर्वी अ‍ॅन्ड्राइड हा शब्द आपल्याला माहितीच नव्हता. तेव्हा केवळ सिंबियन, Java, ब्लॅकबेरी आणि iOS ऑपरेटींग सिस्टमच होत्या. त्यावेळी ios ऑपरेटींग सिस्टम खुपच लोकप्रिय होती. Businessinsider च्या एका अहवालानुसार 2007 ते 20014 या सात वर्षांच्या काळात अ‍ॅन्ड्राइडने 80 टक्के मार्केट काबीज केले. 


आज अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टम असणारे स्मार्टफोन्स सर्वांच्याच पसंतीस उतरतात पण ही ऑपरेटींग सिस्टम कधी सुरू झाली? याचा पाया कोणी रचला? कोणता होता अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टम असणारा पहिला मोबाइल? कसे तयार झाले मिठाईच्या नावावरून अ‍ॅन्ड्राइड हे नाव ?

वाचा कोणी आणि कसे बनवले अ‍ॅन्ड्राइडअ‍ॅन्ड्राइड एक कंपनी आहे.  : — बर-याच लोकांना अ‍ॅन्ड्राइड ही केवळ ऑपरेटींग सिस्टम आहे असे वाटते पण अ‍ॅन्ड्राइड एक कंपनी आहे जी GOOGLE ने विकत घेतली आहे. अ‍ॅंडी रूबिन हा अ‍ॅन्ड्राइडचा जनक आहे. सुरवातीला ही कंपनी डिजीटल कॅमेरा आणि मोबाइल सॉफ्टवेअर बनवण्याचे काम करत असे. 
अ‍ॅंडीने 2000 मध्ये मोबाइल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिझाइन करणारी Danger.com नवाची आणखी एक कंपनी सुरू केली. नंतर MICROSOFT ने ती कंपनी विकत घेतली. 
2005 मध्ये GOOGLE सोबत करार
2005 मध्ये म्हणजेच अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टम तयार होण्यापूर्वीच GOOGLEने या कंपनीला विकत घेतले. त्या अगोदरही GOOGLE अ‍ॅन्ड्राइड ला अर्थसाहाय्य करायचे. अ‍ॅन्ड्राइड GOOGLE सोबत एकत्र आल्यानंतर अ‍ॅंडी आणि त्याच्या सहकार्यांनी ऑपरेटींग सिस्टम बनवायला सुरवात केली. 
GOOGLEचे उपाध्यक्ष डेवीड लावीच्यामते ही डील कंपनीसाठी सर्वत्कृष्ट डील ठरली. 
2007 मध्ये आले अ‍ॅन्ड्राइड
12 नव्हेंबर 2007 मध्ये अ‍ॅन्ड्राइड लॉन्च झाले. तेव्हा अ‍ॅन्ड्राइडचे अ‍ॅन्ड्राइड बीटा हे व्हर्जन होते. तेव्हा गेम्स आणि इतर सॉफ्टवेअर चालवण्यासाठी अ‍ॅन्ड्राइड तयार करण्यात आले होते.  
2008 मध्ये लॉन्च झाला पहिला अ‍ॅन्ड्राइड  मोबाइल 
2008 मध्ये HTC आणि T-Mobile सोबत GOGLE ने अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टम असणारा HTC Dream G2 हा स्मार्टफोन लॉन्च केला.

MOTOROLA ने तयार केला HERO

2009 मध्ये अ‍ॅन्ड्राइडची लोकप्रियता वाढल्यानंतर कंपनीने मोटोरोला ड्राइड ऑपरेटींग सिस्टम लॉन्च केली. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन अ‍ॅन्ड्राइड व्हर्जन 2.2 वर चालत असे.
मिठाइच्या नावावरून तयार झाले अ‍ॅन्ड्राइड हे नाव 
आज अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टमने बाजारात आपले सर्वोत्कृष्ठ स्थान मिळवले आहे. या ऑपरेटींग सिस्टमचे नाव एका मिठाईच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. कंपनीने याचा खुलासा केला नसला तरी हे नाव टीमवर्कमुळे ठेवण्यात आल्याचे रॅन्लड सराफा GOOLE चा एक कर्मचारी सांगतो.   (Named after different dessert or sugary treat)
अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टिम च्या लोकप्रियतेचे कारण 
अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टिम च्या लोकप्रियतेचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ही ओपन ऑपरेटींग सिस्टम आहे. ओपन ऑपरेटींग सिस्टम म्हणजे ही ऑपरेटींग सिस्टम कोणत्याही स्मार्टफोनमध्ये वापरता येते. SAMSUNG, MICROMAX सारख्या सर्वच कंपन्या आता अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टिमचा वापर करतात. 
2010 मध्ये GOOGLE ने आणला पहिला अ‍ॅन्ड्राइड मोबाइल : : 2010 मध्ये GOOGLE ने नेक्सस वन नावाचा पहिला अ‍ॅन्ड्राइड स्मार्टफोन लॉन्च केला. GOOGLE चा हा मोबाइल बाजारात टिकू शकला नाही
2010 मध्ये तयार झाला अ‍ॅन्ड्राइड HERO  2010 मध्ये GOOGLE चा नेक्सस 1 फेल ठरला तरी हे अ‍ॅन्ड्राइडसाठी चांगले ठरले. याच काळात SAMSUNGने GALAXY सिरीजचा पहिला अ‍ॅन्ड्राइड समार्टफोन बाजारात आणला. GALAXY S हा तो स्मार्टफोन. या मोबाइल नंतर मात्र अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टमची घौडदोड सुरू झाली आणि त्याने त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. 
नव्हेंबर 2011 मध्ये अ‍ॅन्ड्राइड आइस्क्रिम सॅन्डविच लॉन्च करण्यात आले. यानंतर तर अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टमचा वापर टॅबलेटमध्येही सुरू झाला. 


2012 मध्ये तर अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टमुळे SAMSUNG नंबर एकची कंपनी बनली.
2012 मध्ये अ‍ॅन्ड्राइड जेलीबीन 4.1 लॉन्च झाले. या ऑपरेटींगमध्ये GOOGLE NOWआणि व्हाइस असिस्टस सारखे फिचर्स होते.हे फिचर्स iPhone च्या Siri फिचर्स पेक्षाही जास्त लोकप्रय ठरले. 
2013 मध्ये तर अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टमचा जणू काही पूरच आला. कित्येक कंपन्यांनी याच वर्षी अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टम असणारे स्मार्टफोन्स बाजारात उतरवले.

Extra tags : Andy Rubin Founder of Android and how it is developed
Exit mobile version