MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

विंडोज १० Anniversary Update : वर्षपूर्तीनिमित्त अनेक नवीन सोयी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 4, 2016
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स

मायक्रोसॉफ्टच्या विंडोज १० ह्या सध्याच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आवृत्तीला वर्षपूर्ती निमित्ताने नवं अपडेट सादर करण्यात आलं आहे. विंडोज ७, विंडोज ८ नंतर ८.१ आणि आता विंडोज १० असा अलिकडचा प्रवास. मात्र ही आवृत्ती शेवटची असून यानंतर विंडोजचं नवं व्हर्जन सादर होणार नाहीये. मायक्रोसॉफ्टने भविष्यात याच विंडोज १० लाच अपडेट करत राहण्याचा निर्णय घेतलाय !

तर आज पाहूया विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम मध्ये कोणती नवीन फीचर्स देण्यात आली आहेत आणि तितकीशी प्रसिद्ध नसलेली जुनी फीचर्ससुद्धा …

कोर्टाना (Cortana) : कोर्टाना ही मायक्रोसॉफ्टची विंडोजसाठीची वॉइस असिस्टेंट(मदतनीस)आहे. अॅपल किंवा गूगलच्या सिरी आणि गूगल नाऊ पेक्षा नक्कीच अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न मायक्रोसॉफ्टकडून सुरू आहे.
याचाच भाग म्हणून आता कोर्टानामध्ये अनेक सोयी देण्यात आल्या आहेत. जसे की आवाजाद्वारे आज्ञा देऊन अलार्म लावणे, रीमेंडर लावणे, “काल काम करत असलेली फाइल मित्राला पाठव”! ही आज्ञा, एखादा विनोद ऐकव, गाणी ऐकव, पुढचं गाणं ऐकव, टायमर लाव, एखादी नोट लिहीत असताना चक्क ते समजून घेऊन रिमाईंडर स्वतः लावते, microsoft.com उघड ह्या सर्व आज्ञा ती लगेच पूर्ण करून उत्तर देते ! अगदी Do an Impression म्हणताच प्रसिद्ध संवादसुद्धा म्हणून दाखवते (जसे की कितने आदमी थे 🙂 ). तुम्ही विंडोज १० वापरत असाल तर नक्की कोर्टाना वापरुन पहा.

कनेक्ट ( Connect) : विंडोज १० मध्ये Connect नावाची सुविधा आहे ज्यामध्ये तुम्ही कनेक्ट अॅप्लिकेशन स्टार्ट मेनू मधून सुरू करायच आणि तुमचं मोबाइल/प्रॉजेक्टर मध्ये जाऊन Cast Screen पर्याय सुरू करायचा आणि चक्क तुमच्या ‘फोनची स्क्रीन’ तुमच्या पीसी/लॅपटॉपवर दिसू लागेल !

विंडोज १० अॅप्स  : विंडोज १० मध्ये विंडोजचं स्वतःचं अॅप स्टोअर असून यामधून आपण अँड्रॉइडवरच्या प्लेस्टोअर प्रमाणेच अॅप्स डाऊनलोड, अपडेट करू शकतो ! सध्या यात त्यामानाने कमी अॅप्स आहेत मात्र अधिक अॅप्ससाठी मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील आहे.

एज ब्राऊजर : आता यामध्ये सुद्धा क्रोम ब्राऊजर प्रमाणे एक्सटेन्शन वापरता येतील ! Adblock,Lastpass सध्या उपलब्ध असून येत्या काळात ही संख्या वाढत जाईल अशी मायक्रोसॉफ्टला आशा आहे.

थीम : आता पांढर्‍या थीम सोबत काळ्या थीमचा सुद्धा पर्याय देण्यात आला आहे. आणखी पसंतीप्रमाणे बदल करण्याची सोय देऊन पर्यायाची सुद्धा वाढ करण्यात आली आहे! स्टार्ट मेन्यू, अॅक्शन सेंटरवर बदल करण्यासाठी सुद्धा सोय देण्यात आली आहे.

स्टार्ट मेन्यू : यामध्ये आता अॅप्स लिस्ट पूर्ण दिसेल (आधी All Apps वर क्लिक करावं लागायच) नेहमी वापरत असलेल्या साठी डाऊनलोड, विडियो, म्यूजिक अशा फोल्डरना डावीकडे जागा देण्यात आली असून शटडाउनसाठी बटनची सोय करण्यात आली आहे.      
  
एक्सबॉक्स (Xbox) : एक्सबॉक्स हा खरेतर गेमिंग कोन्सोल मात्र याच अॅप विंडोज १० मध्ये उपलब्ध असून याद्वारे गेमर्स सोबत कनेक्ट राहता येतं. तसेच एक्सबॉक्सवरील गेम्सचा आनंद घेता येतो.

इमोजी : आता विंडोज १० मध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या इमोजी वापरता येतील.  यूनिकोड मापदंडानुसार अधिक पर्याय देऊन प्रत्येक पिक्सेlचा फायदा मिळेल. वेगळ्या वर्णाप्रमाने चेहर्‍यांच्या इमोजी सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

इतर बदल :

  • जर तुमच्याकडे विंडोज फोन असेल तर तुम्हाला फोन वर आलेल्या नोटिफिकेशन पीसीवर सुद्धा दिसतील आणि आश्चर्य म्हणजे जर तुम्ही स्वाईप करून ती नोटिफिकेशन बंद केली तर ती पीसी आणि मोबाइल दोन्हीकडून पुसली जाईल (सरकवली जाईल!).  
  • आता BlueScreenofDeath (BSOD) म्हणजे काही प्रॉब्लेम वेळेस बंद होऊन निळ्या रंगाच्या स्क्रीनवर एक मेसेज येतो. यामधून बाहेर पडणे जवळपास शक्य नसते.यावेळी कम्प्युटर रिस्टार्ट करण्याशिवाय पर्याय नसतो. यासाठी आता मायक्रोसॉफ्टने QR कोड जोडला आहे ज्याद्वारे आपण नेमक कारण आणि उपाय शोधू शकू …!
  • आजपर्यंतच्या विंडोजमध्ये तुमच्या ओफिशियल कॉपी बद्दल माहिती हार्डवेअरवर साठवली जायची (तुम्ही वापरत असलेल्या विंडोज कॉपीची Key) मात्र त्यामुळे अनेक वर्षे अनेकांना त्रास सहन करावा लागत होता. यावर पर्याय म्हणून आता मायक्रोसॉफ्ट ती KEY यूजरच्या मायक्रोसॉफ्ट अकाऊंटला ऑनलाइन जोडेल! त्यामुळे हार्डवेअर बदल झाला तरी विंडोज अॅक्टिवेट करण्यासाठीअडचण येणार नाही.     
  • बॅटरी सेविंग, वायफाय सेटिंग, स्काइप विडियो, टच डिवाइस साठी विंडोज इंक मध्ये पर्याय, विंडोज मध्येच लिनक्सची बॅश शेल कमांड वापरण्याची सोय !, पीसी लॉक केलेला असेल तरीही कोर्टानाला आज्ञा देण्याची सोय, एकाच पीसीवर अनेक डेस्कटॉप वापरता येणार, अॅक्शन सेंटर मध्ये नोटिफिकेशनमध्ये मोठ्या करत चित्रांचा समावेश करता येणार, फोन/स्मार्ट बॅंड द्वारे लॅपटॉप/पीसी अनलॉक करता येणार, 
  • अधिक वेगवान, अधिक सुरक्षित, जास्त वेळ बॅटरी टिकवण्यासाठी पर्याय, विंडोज अपडेट करणं अधिक सोपं, नोटिफिकेशनसाठी अॅक्शन सेंटर इत्यादि खास वैशिष्ठ्ये आहेत.         

     विंडोज १० Anniversary Update डाऊनलोड करण्यासाठी खालील तीन पर्याय उपलब्ध

  1. Settings > Update > Windows Update
  2. Media Creation Tool द्वारे 
  3. डायरेक्ट ISO फाइल डाऊनलोड करून USB बूट करून. 
ADVERTISEMENT
Tags: BrowserCortanaMicrosoftWindows 10Xbox
ShareTweetSend
Previous Post

Verizon-याहू, फ्लिपकार्ट-जबोंग, MiBook, Amazon Prime बद्दल

Next Post

अॅडब्लॉकर आणि फेसबुकचा अॅडब्लॉकविरोधात नवा अल्गॉरिथ्म !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

February 8, 2023
MicrosoftRewardsIndia

मायक्रोसॉफ्ट रिवार्ड्स भारतात उपलब्ध : एज ब्राऊजर वापरा व बक्षिसे मिळवा!

August 22, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
Next Post
अॅडब्लॉकर आणि फेसबुकचा अॅडब्लॉकविरोधात नवा अल्गॉरिथ्म !

अॅडब्लॉकर आणि फेसबुकचा अॅडब्लॉकविरोधात नवा अल्गॉरिथ्म !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!