व्हॉटसअॅपवर व्हिडिओ कॉलिंग सर्वांसाठी उपलब्ध !

व्हॉटसअॅप या फेसबुकच्या कंपनीने आज अधिकृतरीत्या व्हिडिओ कॉलिंग सेवा त्यांच्या १०० करोड वापरकर्त्यांसाठी खुली केली आहे. व्हॉटसअॅपने अलीकडे अनेक नव्या सोयी उपलब्ध केल्या असून यामध्ये वापरकर्त्यांकडून सर्वात जास्त मागणी व्हिडिओ कॉलची होती. काही दिवसांपूर्वी विंडोज फोनवर आणि नंतर अँड्रॉइडवर Beta (चाचणी) मध्ये व्हिडिओ कॉलिंग सेवा सुरू झाली होती. मात्र आता सर्वांसाठी खुली करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने अपडेट केलं जाईल.  

डाऊनलोड लिंक : WhatsApp on Google Play
डाऊनलोड लिंक : Direct Download (थेट डाऊनलोड)
अपडेट : Version 2.16.351

व्हिडिओ कॉल : या सेवेमध्ये तुम्ही तुमच्या एका मित्राला ज्याच्याकडे व्हॉटसअॅपचं नवं व्हर्जन आहे त्याला व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधून Live व्हिडिओ प्रमाणे बोलू आणि पाहू शकता!
यासाठी ज्याला कॉल करायचा आहे त्याचा Contact उघडा त्यानंतर 📞अशा दिसणार्‍या बटनवर टॅप करा.
यापूर्वी या पर्यायाने ऑडिओ कॉल लागायचा मात्र आता दोन पर्याय दिसतील (Audio Call व Video Call).
व्हिडिओ कॉल निवडा की झाला सुरू तुमचा व्हिडिओ कॉल ! यूट्यूब व्हिडिओ पहा.
यापूर्वी आलेल्या इतर सेवा :
• GIF अॅनिमेशन पाठवण्याची सोय : GIF अॅनिमेशन ही एनेक चित्रे एकत्र मिळून तयार केलेली इमेज फाइल असते ज्यामुळे चित्रे/व्हिडिओ अॅनिमेशन रूपात दिसतात! उदाहरणार्थ :
• फोटो एडिट करण्याची सोय : यासाठी फोटो हा व्हॉटसअॅपमध्येच काढलेला असावा लागतो. या सेवेद्वारे आपण फोटोला क्रॉप, त्यावर अक्षरे लिहू शकतो इमोजी जोडू शकतो, विविध रंगांनी चित्रे काढू शकतो

• ऑडिओ कॉल 📞: ह्या सेवेचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मेसेजप्रमाणेच फक्त कॉलच्या बटनवर क्लिक केल्यास थेट त्या व्यक्तीशी आवाजाद्वारे संपर्क साधता येतो. हा व्हॉटसअॅप कॉल नेहमीच्या वॉइस कॉल प्रमाणेच काम करतो मात्र यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज असते आणि हा मोफत असतो.  

• Reply/Quote : एखाद्या ग्रुपमध्ये अनेकवेळा कोणता सदस्य कोणत्या सदस्याला उद्देशून बोलला हे समजत नाही त्यावेळी हे फीचर उपयोगी पडतं. समजा A सदस्याने मेसेज पाठवला त्याला B ला रिप्लाय देण्यासाठी A च्या मेसेजला Long Press (मेसेजवर जास्त वेळ टॅप करून ठेवा) वरती नवे पर्याय दिसू लागतील. त्यामधील डावीकडे जाणार्‍या बाणाचा पर्याय निवडा आणि B त्याचा मेसेज A टाइप करेल त्यामुळे इतर सदस्यांना संभ्रम निर्माण होत नाही. एखाद्या मेसेजला उद्देशून वापरत बोलण्यासाठी अतिशय उपयुक्त फीचर!  

• स्टार 🟊: तारांकित करता येण्याच्या या सोयीमुळे काही खास मेसेज तारांकित करून नंतर केव्हाही संदर्भासाठी वाचता येतात. मेसेजला Long Press (मेसेजवर जास्त वेळ टॅप करून ठेवा) वरती नवे पर्याय दिसू लागतील. यामध्ये 🟊 चिन्हावर टॅप करा. तुम्हाला त्या मेसेजखाली 🟊 दिसू लागेल. नंतर हे सर्व मेसेज पहाण्यासाठी Menu > Starred Messages मध्ये जा!

• २ स्टेप Authentication : या पर्यायमुळे व्हॉटसअॅप अधिक सुरक्षित होणार असून ह्या सुविधेत तुम्ही तुमचा फोन क्रमांक देऊन ठेवायचा. आणि सोबत एक पिन जोडायचा. व्हॉटसअॅप ठराविक कालावधीनानातर तुम्हाला हा पिन विचारेल ज्यामुळे दुसर्‍या कोना तुमचे संदेश वाचने वाघ्द होईल आणि यामुळे दुसर्‍या फोनवर परवानगीशिवाय (दिलेल्या पिनशिवाय) व्हॉटसअॅप इंस्टॉल करणे शक्य होणार नाही.
यासाठी Menu > Settings > Account > 2 Step Verification मध्ये जा

• डॉक्युमेंट पाठवण्याची सोय 🗋: आता व्हॉटसअॅपवर छायाचित्रे, व्हिडिओ, ऑडिओ यांच्यासोबत PDF डॉक्युमेंटसुद्धा पाठवता येते!

• व्हॉटसअॅप वेब : तुमच्या फोनवरील व्हॉटसअॅप संदेश कम्प्युटरवर पहाण्यासाठी व्हॉटसअॅप वेबचा वापर करा. web.whatsapp.com  ह्या लिंक वर जा फोनमध्ये Menu > WhatsApp Web वर जा आणि कम्प्युटरवर दिसणारा कोड फोनद्वारे स्कॅन करा.  मात्र यासाठी फोन आणि कम्प्युटर दोन्हीमध्ये इंटरनेट सुरू असणे गरजेचे आहे.

• गूगल ड्राइव बॅकअप : तुमचे व्हॉटसअॅपवरील चॅटचे बॅकअप गूगलच्या क्लाऊड सेवमध्ये मोफत साठवण्यासाठी गूगल ड्राइव बॅकअपची सोय देण्यात आली आहे. जेणेकरून तुमच्याकडून व्हॉटसअॅप अनइनस्टॉल झाल/फोन हरवला/रीइंस्टॉल केल तर सर्व चॅट परत मिळवता यावं.
यासाठी Menu > Settings > Chats > Chat Backup > Google Drive Settings मध्ये जा.  

• मराठी व्हॉटसअॅप 🚩: होय व्हॉटसअॅप मराठी भाषेतसुद्धा वापरता येतं !
यासाठी Menu > Settings > Chats > App Language > मराठी

• डेलेवरी टिक✔ : ज्याला मेसेज पाठवला त्याला तो मेसेज पोहोचला आणि त्याने तो वाचला का नाही हे समजण्यासाठी हो सोय देण्यात आली आहे. मेसेज पाठवताच एक करडी टीक म्हणजे मेसेज व्हॉटसअॅपकडे पाठवला गेला. दोन करड्या टीक म्हणजे तो मेसेज त्याच्या फोनमध्ये पोहोचला आणि दोन निळ्या टीक म्हणजे त्याने तो मेसेज वाचला !

• डाटा वापर नियंत्रण : यासाठी Menu > Settings > Data Usage मध्ये जाऊन तुमच्या गरजेप्रमाणे बदल करा.

• नंबर बदल : होय तुमचा व्हॉटसअॅप क्रमांक बदलता येतो.
यासाठी Menu > Settings > Account > Change Number मध्ये जा

• ग्रुप सदस्य मर्यादा २५६ : व्हॉटसअॅपच्या नव्या नियमांनुसार व्हॉटसअॅपवर ग्रुप सदस्यांची मर्यादा २५६ करण्यात आली आहे.
 ग्रुप Invite Link : इतरांना तुमच्या ग्रुप सदस्यता आमंत्रण देण्यासाठीसुद्धा नवी सोय देण्यात आली असून ग्रुप अॅडमिनने यासाठी Group > उजव्या कोपर्‍यात वर Add Member > Invite to group via Link

• अनेक अॅडमिन : व्हॉटसअॅपच्या नव्या नियमांनुसार एका ग्रुपमध्ये एकापेक्षा अधिक अॅडमिन(ग्रुप प्रमुख)बनवता येतात. अॅडमिनला ग्रुपमध्ये नवीन सदस्य जोडणे, सध्याच्या सदस्यांना काढणे, इ. विशेषाधिकार असतात.

• ब्रॉडकास्ट : ह्या सोयीद्वारे आपण एकच मेसेज एकाचवेळी अनेकांना पाठवू शकतो.
यासाठी Menu > New Broadcast नंतर ज्यांना पाठवायचा आहे ते contact निवडा, मेसेज टाइप करा आणि सेंड करा(पाठवा).

• लोकेशन शेअर 📍: तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तुमची सध्याची लोकेशन (जागा) पाठवू शकता. ज्यामध्ये तुम्ही गूगल मॅपवरुण लिंक देऊन शकता. जेणेकरून तुमचा पत्ता मित्रांना समजू शकेल!
यासाठी ज्यांना पाठवायचा आहे तिथे जा, Attach 📎 (पेपरक्लिप आयकॉन) वर क्लिक करा आणि लोकेशन हा पर्याय निवडा.

अपडेट : अधिकृतरित्या सर्वांना व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे (22-11-2016)
काही साइटवर व्हॉटसअॅपवर ग्रुप व्हिडिओ कॉलबद्दल खोटे मेसेज पसरत आहेत. 
व्हॉटसअॅपवर ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध नाहीच याची नोंद घ्यावी. (ग्रुप व्हिडिओ कॉलसाठी तुम्ही गूगलच Hangouts हे अॅप्लिकेशन वापरू शकता.        
ग्रुप invite चा वापर करताना ओळख असलेल्या ग्रुपमधेच सहभागी व्हा!
incoming search terms : whatsapp video calling android features location broadcast admin settings data usage marathi drive backup 2 step verification quote reply call GIF PDF
व्हॉटसअॅपवर व्हिडिओ कॉलिंग सर्वांसाठी उपलब्ध ! व्हॉटसअॅपवर व्हिडिओ कॉलिंग सर्वांसाठी उपलब्ध ! Reviewed by Sooraj Bagal on November 15, 2016 Rating: 5

1 comment:

  1. What's up to every body, it's my first go to see of this webpage; this web
    site contains awesome and really fine material for
    visitors.

    ReplyDelete

Powered by Blogger.