गूगलच्या भारतीय भाषांसाठी नव्या सोयी : Gboard आता मराठीत !

गूगल इंडियाने भारतातील अधिकाधिक लोकांना ऑनलाइन येण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने आज बर्‍याच नव्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये मुख्य म्हणजे भारतीय भाषांमध्ये मशीन लर्निंगची सोय!
गूगलने असं जाहीर केलं आहे की न्यूरल मशीन भाषांतर आता नऊ भारतीय  झालं आहे – हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली, पंजाबी आणि गुजराती.
न्यूरल मशीन भाषांतरामुळे कालपरत्वे भाषांतराचा दर्जा सुधारला जातो आणि वेगसुद्धा वाढतो. यामध्ये शब्द भाषांतरित करण्याऐवजी थेट संपूर्ण वाक्यं भाषांतरित होतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर भाषांतर शक्य झाले आहे जसे कि गाण्यांचे शब्द, लेख, पुस्तके, वेबपेजेस, बातम्या, खेळांचे धावफलक, इ. सर्वकाही आपल्या मातृभाषेत!

राजन आनंदन (गूगल इंडिया) : “सर्व भारतीयांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याचं गूगलचं उद्दिष्ट आहे. आम्ही भारतीयांना इंटरनेट येणाऱ्या अडचणींचा शोध घेतला असून त्यानुसार नवे बदल केले गेले आहेत. ४ कोटी भारतीय सध्या इंटरनेट वापरत असून २०२० पर्यंत  ६ कोटी पर्यंत वाढवायची आहे.” त्यांनी यासोबत असंसुद्धा सांगितलं आहे कि भारतात ३ कोटी लोक स्मार्टफोन इंटरनेटचा वापर करतात. त्याचप्रमाणे गूगलच्या RailTel  या रेल्वे स्टेशन्सवर मोफत वायफाय पुरवण्याच्या सोयीबद्दलसुद्धा सांगितलं.

गूगल ट्रान्सलेटचा जगभरापैकी भारतात सर्वाधिक वापर केला जातो.  गूगलच्या म्हणण्यानुसार न्यूरल नेटवर्कना भाषांतर करण्यासाठी १० सेकंद वेळ लागायचा आता ०.२ सेकंदावर आणला आहे!
याचवेळी गूगल महत्वाची घोषणा केली ती म्हणजे Gboard हा गूगलचा स्मार्टफोन किबॉर्ड आता २२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाला आहे. आता यूजर्स शब्द/अर्थ/ईमोजीसुद्धा भारतीय भाषांमध्ये शोधू शकता!  

Gboard ची वैशिष्ट्ये :  डाउनलोड लिंक
१. कुठल्याही अॅपमध्ये टाईप करता करताच इंटरनेटवर हव्या त्या गोष्टीचा सर्च करता येतो
२. समजा व्हॉटसअॅपवर चॅट व्हीडीओ शेअर करायचा आहे, तर व्हॉटसअॅपमध्येच किबोर्डवर सर्च करून ती लिंक लगेच पोस्ट करता येते. आहे न कमाल !
३. इमोजी शोधता येतात. टाईप केलेल्या मजकुरावरून ईमोजी आपोआप सुचवल्या जातात!
४. GIF  ऍनिमेशन्स किबोर्डमध्येच सर्च करून जोडण्याची सोय!
५. टाईप करता करता भाषांतर करण्याची सोय!
६. रंगसंगती/थिम्स उपलब्ध, आयफोन व अँड्रॉइड दोन्हीसाठी उपलब्ध!
७. आता मराठीमध्येसुद्धा उपलब्ध (१२० हुन अधिक भाषा एकाच कीबोर्डमध्ये!)
८. ट्रान्सलिटेशन सपोर्ट म्हणजे “Google” असं स्पेलिंग टाईप केल्यास “गूगल” असे टाईप होईल!
९. हा कीबोर्ड जसजसे टाईप कराल तसतसं शिकत जातो आणि अधिक सहज शब्द सुचवतो जेणेकरून टायपिंग अधिक सोपं आणि लवकर होतं!

Google Translate । Gboard on Google Play
याबद्दल अधिक जाणून घ्या ह्या लिंकवर Bringing down the language barriers Google India

Exit mobile version