व्हॉट्सअॅपवर पाठवलेला संदेश परत घेत डिलिट करता येणार!

बरीच वर्षं एकदा एक संदेश व्हॉट्सअॅपवरून चुकून पाठवला की तो परत दुरुस्त किंवा डिलिट करता येत नव्हता. जरी आपण डिलिट केला तरी ज्यांना पाठवला आहे त्यांच्याकडे तो पोहोचायचाच म्हणजे तो फक्त आपल्याच फोनवरून डिलिट झालेला असायचा. आता मात्र दोन्ही फोनवरून संदेश काढून टाकण्याची सोय व्हॉट्सअॅप सुरू करत आहे! सात मिनिटाच्या आत जर Delete For Everyone पर्याय निवडला तर तो संदेश दोन्ही फोनवरून काढून टाकला जाईल! त्यामुळे आता एखादा संदेश चुकून पाठवला गेला कि लगेच तो मागे घेत डिलीट करता येईल!

ही नवी सोय कशा प्रकारे वापरायची ?

1. व्हॉट्सअॅप उघडून जो संदेश डिलीट करायचा आहे तिथं जा
2. त्या संदेशावर टॅप करून दाबून धरा > डिलीटचे चिन्ह निवडा
3. Delete for Everyone निवडा
4. You deleted this message असं दिसेल.

डिलिट आयकॉन निवडल्यावर दोन पर्याय दिसतील
DELETE FOR ME : फक्त तुमच्या फोनमधून डिलीट होईल
DELETE FOR EVERYONE : तुमच्या व ज्याला संदेश पाठवला आहे त्याच्यासुद्धा फोनमधून डिलीट होईल!

यासाठी मर्यादा/नियम :
• पाठवल्यावर पहिल्या सात मिनिटाच्या आत डिलिट केला तरच दोघांसाठी डिलीट होईल
• सात मिनिटांच्या नंतर डिलिट केल्यास कोणत्याही मार्गाने Delete For Everyone करता येणार नाही!
• त्या सात मिनिटांमध्ये ज्यांना संदेश पाठवला आहे त्यांनी व्हॉट्सअॅप उघडलं तर ते तो संदेश वाचू शकतील!
• ही सुविधा वापरण्यासाठी दोघांकडे व्हॉट्सअॅपचं नवीन आवृत्ती असावी (Latest Version)
• ज्यांना संदेश पाठवला आहे त्यांच्या फोनमधून संदेश डिलीट झालाच आहे किंवा नाही यासंबंधी व्हॉट्सअॅप कोणतीही माहिती आपल्याला देणार नाही!

याविषयी व्हॉट्सअॅपचा अधिकृत लेख  (Latest Version : Stable 2.17.393/ Beta 2.17.401)
incoming search terms : Whatsapp unsend delete for everyone message 

Exit mobile version