फ्लिपकार्टचा स्वतःचा स्मार्टफोन : बिलियन Capture+ सादर!

भारतातील आघाडीची ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टने आता स्मार्टफोन बाजारात प्रवेश करत बिलियन (Billion) या ब्रॅंड नावाखाली स्मार्टफोन सादर केले आहेत. अनेक नव्या कंपन्या त्यांच्या नेहमीच्या प्रॉडक्टस सोबत आता स्मार्टफोन्स बनवण्यावर सुद्धा भर देऊ लागल्या आहेत. त्यात आता फ्लिपकार्टची भर पडली आहे. यापूर्वी अॅमेझॉनने काही वर्षांपूर्वी असा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला होता. आता स्मार्टफोन मार्केट वाढल असल्यामुळं स्वस्त किंमतीत स्मार्ट फिचर्स असलेला फ्लिपकार्टचा फोन यशस्वी होऊ शकतो. याआधी फ्लिपकार्टने स्मार्टबाय ब्रॅंड खाली वेगवेगळी उपकरणे सुद्धा सादर केली आहेत. कमी दरात ड्युअल कॅमेरा असलेला फोन सादर केला आहे tronX द्वारे भागीदारीत जो पूर्णतः भारतात डिजाइन करून भारतात बनवलेला असेल असा दावा फ्लिपकार्टने केला आहे! मेड इन इंडिया हे याचं वैशिष्ट्य म्हटलं आहे.  सोबत ओला, सोनी लिव्ह, आयडिया यांच्या ऑफर्स!

लिंक : Billion Capture + on Flipkart 

Flipkart Billion Capture + सुविधा (Features) :
डिस्प्ले : 5.5″ फुलएचडी 1920 x 1080p
प्रोसेसर :  Qualcomm Snapdragon 625 64-bit Octa Core 2GHz
GPU : Adreno 506
रॅम : 3GB/4GB स्टोरेज : 32GB/64GB
कॅमेरा : 13MP + 13MP ड्युअल कॅमेरा,  F2.0 
फ्रंट कॅमेरा : 8MP  F2.0
बॅटरी : 3500mAh सोबत क्विक चार्ज सपोर्ट! १५ मिनिटाच्या चार्जवर ७ तास चालेल असा दावा!
ऑपरेटिंग सिस्टिम : स्टॉक अँड्रॉइड 7.1.2 नुगट लवकरच ओरिओ अपडेटसुद्धा!
इतर : टाइप सी TypeC पोर्ट,  फिंगरप्रिंट स्कॅनर,

किंमत : 3GB+32GB ₹१०९९९
किंमत : 4GB+64GB ₹१२९९९
हा फोन १५ नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

flipkart launched smartphone brand Billion Capture + 

Exit mobile version