इंटेल प्रोसेसरमध्ये दोष : मेल्टडाउन आणि स्पेक्टर !

इंटेल या कम्प्युटर प्रोसेसर बनवणार्‍या जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीच्या प्रोसेसरमध्ये सुरक्षेसंबंधित मोठा दोष आढळला असून यामुळे या सर्व प्रोसेसरची कामगिरी ३० टक्क्यांपर्यंत घसरू शकते! कम्प्युटर जगात याची गंभीर दखल घेतली गेली असून अॅपलने जाहीर केलेल्या पोस्टनुसार त्यांच्या सर्वच मॅक कॉम्पुटरमध्ये हा Flaw/Exploit/दोष दिसून आला आहे! हे प्रकरण इतक मोठं आहे कि इंटेलच्या प्रमुखांनी (CEO) याविषयी बातमी बाहेर पडताच स्वतःचे सर्व शेअर्स विकून टाकले आहेत! 
या flaws ना Meltdown आणि Spectre अशी नावे देण्यात आली असून हे काही प्रमाणात दुरुस्त देखील न करता येणारे दोष आहेत! इंटेलच्या प्रोसेसरमध्ये कामगिरी मध्ये फरक पडावा म्हणून प्रोसेसेसची रांग लावून त्यांना माहिती पुरवली जायची मात्र काही अभ्यासकांच्या हे लक्षात आलं कि त्या रांगेची संवेदनशील माहिती मध्यल्यामध्ये उघड केली जाऊ शकते, जे सुरक्षेच्या दृष्टीने फार घातक ठरू शकतं.

Meltdown : हा पहिला मेल्टडाउन असून यावर बऱ्याच वेळा विंडोज आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अपडेट्स देऊन दुरुस्त करण्याचे प्रयत्न झाले आहेत! यातील दोषामुळे कर्नल डेटा लीक केला जात असून यामुळे युजरचा प्रोग्रॅम डेटा सुरक्षित राहत नाही! यामुळे अधिक प्रोसेस रन केल्या जाऊन कामगिरी खालावली जाऊ शकते! इंटेल चिप्स असणाऱ्या सिस्टिम्सवर याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे कारण कारण त्यामध्ये कोणतीही कर्नल मेमरी युजर प्रोग्रॅमद्वारे वाचली जाऊ शकते. (जी सुरक्षिततेच्या दृष्टीने अजिबात चांगली गोष्ट नाही) यासाठी ऑपरेटिंग सिस्टिम बनवणाऱ्या प्रमुख कंपन्यांनी अपडेट्सद्वारे दुरुस्ती करण्याला सुरुवात केली आहे.

Spectre : या साधारण प्रकारचा दोष असून execute करण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. यात आणखी वाईट गोष्ट म्हणजे यावर थेट उपाय करता येणार नाहीये! कारण प्रकारचं execution थांबवणं मर्यादित प्रकारे शक्य आहे आणि त्यापलीकडे उपाय माहित नाहीयेत! यामध्ये इंटेलसोबत AMD, ARM आधारित सर्व फोन्स, कॉम्प्युटर्सना फटका बसला आहे. मात्र या दोषामुळे दुरुस्त करायला अवघड असला तरी हॅकर्सना सुद्धा माहिती चोरणं खूप अवघड (पण शक्य!) आहे!

या दोषांवर इंटेलची अधिकृत प्रतिक्रिया : Intel Responds to Security Research Findings

कोणते कॉम्पुटर या दोषांमध्ये येतात ? : अॅपलने त्यांच्या सर्वच मॅक कॉम्पुटर आणि iOS डिव्हायसेसमध्ये हे दोष आढळल्याचं जाहीर केलं आहे. मात्र याचा काही परिणाम युजर वरती होईल याची शक्यता त्यांनी फेटाळली आहे. सोबत इंटेल आधारित Skylake प्रोसेसर वगळता बहुधा सर्व विंडोज व लिनक्स आधारित कॉम्पुटर्स मध्ये हे दोष पाहायला मिळतील.

याचा काय परिणाम होऊ शकतो? : सामान्य वापरकर्त्यांना याचा फारसा फरक पडणार नाही असं स्पष्टीकरण इंटेल कडून देण्यात आलं आहे यांना फार फार तर २ ते ७ % कामगिरीत फरक पडलेला दिसेल, जो सामान्य मनाला जातो. मात्र workload जास्त आणि असे युजर प्रोग्रॅम इन्स्टॉल असतील जे कर्नलकडून डेटा मागत असतील त्यांना मात्र याचा फटका बसू शकतो! यात प्रामुख्याने Enterprise युजर आहेत.

उपाय काय ? : विंडोज कॉम्पुटर, लिनक्स कॉम्पुटर, अॅपल MacOS आणि iOS आधारित कॉम्पुटर, फोन्स, टॅब्लेट्स याना सिस्टिम अपडेट्स पुरवण्यात येत असून त्यानुसार आपली सिस्टिम अपडेट् करून घ्यावी.
अधिक कोणती पावले उचलावीत याबद्दल व्हर्जचा लेख : Protect PC From Meltdown and Spectre

दरम्यान AMD च्या प्रोसेसरना फारसा फटका बसला नाहीये. विशेष म्हणजे इंटेलबाबत बातमी बाहेर पडल्यावर AMD च्या शेअर्सनी बाजारात उसळी घेतली होती! 
इंटेल प्रोसेसरमध्ये दोष : मेल्टडाउन आणि स्पेक्टर ! इंटेल प्रोसेसरमध्ये दोष : मेल्टडाउन आणि स्पेक्टर ! Reviewed by Sooraj Bagal on January 05, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.