गूगलने पुणे शहरात सुरू केले आहेत १५० ठिकाणी मोफत वायफाय!

काही महिन्यांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर सुरु झालेली सेवा गूगलची मोफत वायफाय सेवा आता शहरामध्ये सुद्धा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे! गूगल स्टेशन हॉटस्पॉट्स
पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत रेल्वे स्टेशन्सनंतर आता शहरातसुद्धा एल अँड टी कंपनीसोबत सहकार्याने बागा, हॉस्पिटल्स, पोलीस स्टेशन्स, काही बस स्थानके, संग्रहालयं अशा ठिकाणी मोफत वायफाय सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे! सध्या गूगलतर्फे या ठिकाणी चाचण्या सुरु असून लवकरच आणखी ठिकाणी उपलब्ध!
अधिक माहिती : https://goo.gl/oC2sjP
या ठिकाणी उपलब्ध : https://goo.gl/SALPK4

अपडेट : ही सेवा गूगलकडून आता हळूहळू बंद करण्यात येणार आहे. 2020 मध्ये भारतीय डेटा रेटस पूर्वीपेक्षा कमी झाल्याने आणि लोकांचा वायफायवापर कमी झाल्याने आर्थिकदृष्ट्या ही सेवा चालवणं शक्य होत नाही असं स्पष्टीकरण गूगल तर्फे देण्यात आलं आहे.  (१७ फेब्रुवारी २०२०)

search terms google wifi free india pune L&T gardens hospitals police stations smart city PSCDCL

Exit mobile version