AMD 2990WX तब्बल 32 Cores असलेला जगातला सर्वात शक्तिशाली प्रोसेसर!

एएमडी (AMD) ने आज त्यांच्या सर्वोत्कृष्ट प्रोसेसर थ्रेडरिपरची नवी आवृत्ती Threadripper 2 सादर केली असून यामध्ये तब्बल ३२ कोअर्स (32 Cores 64 Threads) आहेत. यामुळे हा जगातला सर्वात शक्तिशाली डेस्कटॉप प्रोसेसर बनला आहे. ३२ कोअर्स असलेला प्रोसेसर बनवण्यात एएमडीने चक्क इंटेलला मागे टाकलं आहे!

AMD ने आज जाहीर केलेला हा प्रोसेसर आता जगभरात प्रि ऑर्डरसाठी उपलब्ध झाला असून हा 2nd Gen AMD Ryzen Threadripper या नावाने ओळखला जाईल. Cinebench R15 या multi-threaded CPU test साठीच्या बेंचमार्क चाचणीमध्ये जागतिक विक्रम केला आहे! आपण नेहमी वापरतो त्या कॉम्प्युटर्समध्ये शक्यतो दोन किंवा चार कोअर्स असतात या नव्या प्रोसेसरमध्ये ३२ कोअर्स आहेत!

32-core, 64-thread असलेला 2nd Gen AMD Ryzen Threadripper 2990WX प्रोफेशनल कंटेंट क्रिएटर्ससाठी, डेव्हलपर्स साठी उपयोगी पडेल ज्यांना सर्वात उत्तम अशी कामगिरी करणारा प्रोसेसर हवा आहे! यामध्ये चार मॉडेल्स सादर करण्यात आली असून २०१८ मध्येच उपलब्ध होत आहेत. हे सर्व प्रोसेसर 12nm “Zen+” core architecture वर आधारित असून सध्याच्या X399 चिपसेट असलेल्या मदरबोर्डसवर चालेल. यातल्या 2990WX ची भारतीय किंमत ₹१,४९,००० …! AMD Ryzen Threadripper 2990WX Video

AMD Ryzen Threadripper 2990WX Features :

  • 32 Cores / 64 Threads
  • 3.0 GHz Base and 4.2 GHz Max Boost Clocks
  • Socket sTR4
  • DDR4 Support
  • 12nm Pinnacle Ridge
  • Unlock for Overclocking

गेल्या महिन्यात झालेल्या कार्यक्रमात हा प्रोसेसर ओव्हरक्लॉक करून लिक्विड नायट्रोजनचा वापर करत थेट 5.1GHz पर्यंत नेला होता आणि हा सुद्धा एक विक्रमच होता! इंटेलच्या i9 7980XE प्रोसेसरला बऱ्याच मोठ्या फरकाने याने मागे टाकलं होतं! गेली कित्येक वर्ष मक्तेदारी असलेली इंटेल आता मात्र काही प्रमाणात मागे पडत असल्याचं चित्र निर्माण होऊ लागलं आहे. एएमडीने त्यांच्या सीईओ लिसा सु यांच्या नेतृत्वात रायझन प्रोसेसरमालिकेने मोठं यश मिळवलं आहे. काही दिवसांपूर्वी मराठीटेकनेसुद्धा रायझन प्रोसेसर आधारित कॉम्पुटर कसा तयार करायचा याबद्दल व्हिडीओ युट्युब चॅनलवर प्रसिद्ध केला आहे. 

search terms : 2nd Generation AMD Ryzen Threadripper Processor 2990WX       
Exit mobile version