गूगलचं ब्लॉगर्ससाठी नवं अॅप Blog Compass : वर्डप्रेस व ब्लॉगर दोन्हीसाठी सपोर्ट!


गूगलने भारतात ब्लॉगरसाठी ब्लॉग कंपस (Blog Compass) नवं अॅप सादर केलं असून ब्लॉगर्सना त्यांची साईट मॅनेज करता यावी आणि लिहिण्यासाठी संबंधित मुद्दे/टॉपिक्स मिळावेत या उद्देशाने हे अॅप बनवण्यात आलं आहे. ह्या अॅपची सध्या चाचणी सुरु असून हे सध्या प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.
डाऊनलोड लिंक : Blog Compass on Google Play
साईट/ब्लॉगचे स्टॅट्स, कमेंट्स अप्रूव्ह करणे, आणि सोबतच ब्लॉगमध्ये कशा आणि कोणत्या सुधारणा करता येतील याविषयी माहिती मिळेल! या माहितीसाठी यामध्ये लर्निंग सेंटरचा समावेश असून यामुळे SEO सुधारण्यात आणि गूगल अनॅलिटिक्सला समजून घेण्यात मदत होईल. 
संबंधित टॉपिक बद्दल लेख पाहता येणं ही याची सोय उपयोगी पडेल. एखादा विषय आपण सुद्धा निवडू शकतो आणि मग त्या आधारित संदर्भ आपणास सहज वाचायला मिळतील! सोबत आपल्या वर्डप्रेस/ब्लॉगर ब्लॉगला किती लोकांनी भेट दिली यासारखी माहिती स्टॅट्सद्वारे मिळेल!
अधिकृत माहिती Blog Compass for Bloggers
हे अॅप डाउनलोड करून आपल्या साईट/ब्लॉगला जोडलेल्या गूगल अकाउंट द्वारे लॉगिन करावं लागेल. वर्डप्रेस ब्लॉग असेल तर त्याला जेटपॅक (Jetpack) प्लगिन असेल तरच या अॅपचा स्टॅट्स पाहण्यासाठी वापर करता येईल. गूगल अकाउंट निवडताच त्या सोबत जोडलेल्या सर्व साईट्स/ब्लॉग्सची यादी दिसेल त्यामधून निवड करायची आणि त्यानंतर ब्लॉग कंपस वापरण्यास तयार...!

search terms : blog compass by google app for bloggers wordpress and blogger support marathi blogs
गूगलचं ब्लॉगर्ससाठी नवं अॅप Blog Compass : वर्डप्रेस व ब्लॉगर दोन्हीसाठी सपोर्ट! गूगलचं ब्लॉगर्ससाठी नवं अॅप Blog Compass : वर्डप्रेस व ब्लॉगर दोन्हीसाठी सपोर्ट!    Reviewed by Sooraj Bagal on September 07, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.