गोप्रो Hero 7 सादर : HyperSmooth Video, LiveStream सारख्या भन्नाट सुविधा!

GoProHero7Black

गोप्रो या अॅक्शन कॅमेरासाठी प्रसिद्ध असणार्‍या कंपनीने त्यांच्या हीरो मालिकेत नवा कॅमेरा सादर केला असून GoPro Hero 7 असं या मॉडेलचं नाव आहे. गेल्या काही महिन्यात अडचणीतून जात असलेल्या गोप्रो कंपनीसाठी अॅक्शन कॅमेरा चांगली गोष्ट ठरू शकतो. काही महिन्यापूर्वी त्यांनी GoPro Hero 6 आणि GoPro Fusion हे दोन अॅक्शन कॅमेरे सादर केले होते मात्र Hero 6 मध्ये म्हणावं तेव्हढं नावीन्य नव्हतं. म्हणून GoPro Hero सुद्धा सादर झाला होता. Fusion ने मात्र कमाल केली होती.  आता यावेळी Hero 7 कडूनही तशाच अपेक्षा असतील. यामध्ये अनेक नव्या सोयी जोडून सुधारणा केल्यामुळे या Hero 7 ला चांगला प्रतिसाद लाभू शकेल!

आज तीन मॉडल्स सादर करण्यात आली असून Black, Silver व White अशी त्यांची नावे आहेत. तिन्हीमधील सुविधांमध्ये थोडाफार फरक असून त्यानुसार तिघांची किंमतही वेगळी आहे.

गोप्रो हिरो ७ ब्लॅक (GoPro Hero 7 Black) :

  • HyperSmooth Video : यामुळे गेल्या सर्व गोप्रो मॉडेलपेक्षा उत्तम गुणवत्तेचं Stabilization पाहायला मिळेल. जास्त हालचाल असलेल्या व्हिडीओमध्ये गिम्बलशिवाय इतक्या चांगल्या प्रकारे शूट करणं नक्कीच मोठी सुधारणा आहे!
  • Waterproof and Rugged : १० मीटर खोल पाण्यात सुद्धा वापरता येईल! सोबत उंचावरून पडण्यासारख्या गोष्टी सुद्धा सहन करू शकेल!       
  • Voice Control : व्हॉइस कमांड द्वारे नियंत्रित करता येईल!
  • SuperPhoto : HDR च्या साहाय्याने आपोआप गुणवत्ता सुधारून नॉईस कमी करून फोटो निघेल!
  • Live Streaming : होय आता या लहानश्या कॅमेराद्वारे व्हिडीओ लाईव्ह स्ट्रीम करता येईल! 
  • TimeWarp Video : टाइम लॅप्स काढत असताना वेगवेगळ्या जागी थांबून काढता येईल जेणेकरून TimeWarp इफेक्ट सहज साधता येईल! 
  1. GoPro Hero 7 Black : $399.99 : 4K60, 12MP, 8x Slomo
  2. GoPro Hero 7 Silver : $299.99 : 4K30, 10MP, 2x Slomo
  3. GoPro Hero 7 White : $199.99 : 1080p60, 10MP, 2x Slomo

आज सादर झालेल्या तीन कॅमेरा एकमेकांसोबत तुलना या लिंक वर पाहता येईल :
Compare GoPro Hero 7 Black, White, Silver, Fusion
   
search terms GoPro launches new action camera Hero 7 Black Silver White with HyperSmooth Stabilized Video

Exit mobile version