इस्रोच्या हायसिसचं पीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण! इतर : नासा इनसाईट मंगळावर पोहोचलं!

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)ने आज PSLV-C43 रॉकेटद्वारे Hyperspectral Imaging Satellite (HysIS) या उपग्रहाच श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केलं. या मोहिमेचे कालावधी ५ वर्षं असेल. हायसिससोबत इतर ३० उपग्रहसुद्धा सोडण्यात आले आहेत. यामधील एक मायक्रो तर उर्वरित नॅनो प्रकारचे आहेत आणि हे आठ देशांच्या वतीने अवकाशात झेपावले आहेत.

हायसिस हा भारताचा पहिलाच hyperspectral imaging satellite आहे. यामध्ये digital imaging आणि spectroscopy यांचा जोडणी केलेली असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणं सोपं होईल. ज्यामुळे कृषी क्षेत्रात चांगली मदत होईल. जमिनीवरील पाण्याचा अभ्यास, पर्यावरण अभ्यास, प्रदूषण शोध अशा गोष्टी करता येतील. 
यासोबत नासाने काही महिन्यापूर्वी (५ मे २०१८) पाठवलेलं इनसाईट मंगळावर पोहोचलं असून तिथून मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे यावर आपली नवे पाठवण्याचं आवाहन नासाने केलं होत ज्यात १ लाख भारतीयांनी नवे पाठवली होती अशी जगभरातील नावे एकत्र करून एका चिपमध्ये साठवून ती इनसाईटमध्ये जोडली गेली आहे. यामुळे या सर्वांची नवे मंगळावर पोहोचली आहेत. इनसाईट हा पहिलाच प्रकल्प असेल ज्यामध्ये रोबोटिक हाताचा वापर केला असेल जो मंगळावर वस्तू ठेवण्यासाठी वापरला जाईल! तसेच यावेळी कॅमेरामध्ये RAW इमेजेस कॅप्चर करण्याची सोय करण्यात आली आहे!

नासाच्या इनसाईटने पाठवलेल पहिलं छायाचित्र!

Exit mobile version