या गेम स्ट्रिमरने गेम्स खेळून २०१८ मध्ये तब्बल ७० कोटी कमावले!

गेम खेळून कुठे पैसा मिळत असतो का वगैरे प्रश्न पडण्याआधी वाचा… निंजा (टायलर ब्लेविन्स) या फोर्टनाइट ही बॅटल रोयाल गेम खेळत स्ट्रिम करणार्‍या गेमरने ट्विच या गेमिंगसाठी असलेल्या वेबसाइटवर जाहिराती आणि प्रायोजित करारांद्वारे जवळपास ७० कोटी (10 Million USD) कमावले असल्याचा अंदाज एका रिपोर्टमध्ये व्यक्त केला गेला आहे! फोर्टनाइट ही गेम अचानक प्रसिद्धेच्या उच्चांकावर पोहोचली असताना सर्वाधिक लोक निंजाची स्ट्रिम पाहत आहेत. निंजा २०१८ मध्ये जवळपास ४००० तास गेम्स खेळला आहे!

अनेक लोकांना असा प्रश्न पडतोच की गेम्स खेळून एव्हढे पैसे मिळवणं किंवा त्यावर करियर करणं कसं शक्य आहे? तर होय हे शक्य आहे. टायलर म्हणजेच निंजाने हे करून दाखवलं आहे. निंजा (Ninja) हे त्याच गेममधल नाव. CNN च्या माहितीनुसार सव्वा कोटी लोक त्याच्या ट्विच चॅनलला फॉलो करतात ज्यामुळे तो ट्विच(Twitch)वर सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला गेमर आहे. यामधील जवळपास ४०००० लोक निंजाची स्ट्रिम पाहण्यासाठी पैसे मोजतात! ही रक्कम प्रत्येकी ३५० ते १७०० दरमहा इथपर्यंत जाते! युट्युबवरसुद्धा निंजा बराच प्रसिद्ध असून तिथे त्याच तब्बल 2 कोटी सबस्क्रायबर्स आहेत! हा दोन प्लॅटफॉर्मवरुएनएम जाहिराती आणि सभासद यांच्यामुळे मिळणारा पैसा आणि प्रायोजित करणार्‍या विविध कंपन्या (सॅमसंग, उबर, रेड बुल, इ.) यांच्या एकत्रित रकमेचा अंदाज व्यक्त करता निंजाने वर्ष २०१८ मध्ये 10 Million Dollars कमावले असल्याच बोलल जातय. अर्थात अधिकृतरीत्या स्वतःची कमाई जाहीर करण्यास प्रतिबंध असल्यामुळे तो स्वतः हे जाहीर करू शकत नाही.

याचा सरळ अर्थ प्रत्येक गेमरला एव्हढ यश मिळतं आणि प्रत्येक जण करियर घडवू शकेल असं नाही. निंजा प्रथमतः प्रचंड गुणवत्ता असलेला गेमर आहे. त्यामुळेच त्याच्या व्हिडिओ स्ट्रिम पाहण्याच प्रमाण सर्वाधिक आहे. प्रोफेशनल गेमिंग विश्वात गेम्स खेळण्याची सवय, त्यामध्ये असलेलं कसब खूप महत्वाच असतं. पाहणारा प्रेक्षक आणि गुणवत्ता यामुळे निंजाचा दोन वर्षात अगदी ५००० पासून २ कोटी सबस्क्रायबर्स असा प्रवास झाला आहे! भारतात गेम स्ट्रिम्स पाहण्याच प्रमाण फार कमी असलं तरी बाहेरच्या देशात दुसर्‍यांना गेम्स खेळताना पाहणं इतक्या मोठ्या प्रमाणात घडत आहे की एकूण पाहणार्‍यांच्या संख्येने टीव्ही पाहणार्‍या प्रेक्षकांना मागे टाकलं आहे…!

Ninja (Tyler Blevins) Twitch Channel : twitch.tv/Ninja

निंजाचं ट्विच चॅनल
Exit mobile version