अपेक्स लेजंड्स : पब्जी, फोर्टनाइटनंतर आता नवी गेम चर्चेत!

उपलब्ध झाल्यावर एका आठवड्यातच २.५ कोटी गेमर्स ही गेम खेळत आहेत!

Apex Legends या नव्या बॅटल रोयाल प्रकारच्या ऑनलाइन मल्टिप्लेयर गेमला प्रचंड प्रतिसाद मिळत असून ही गेम उपलब्ध झाल्यापासून अवघ्या सात दिवसातच तब्बल २.५ कोटी गेमर्स ही गेम खेळत आहेत. ही गेम पीसी, प्लेस्टेशन, एक्सबॉक्सवर मोफत उपलब्ध आहे!

डाऊनलोड लिंक : www.ea.com/games/apex-legends

ही गेम आता इतकी प्रसिद्ध होत आहे की यूट्यूब व ट्विच वरील बरेच प्रसिद्ध स्ट्रिमर्स आता फोर्टनाईट सोडून अपेक्सवर लक्ष केंद्रीत करत आहेत! गेम सादर झाल्यावर तीन दिवसातच १ कोटी प्लेयर्सचा टप्पा गाठला होता! रिस्पॉन एंटरटेंमेंटतर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.

एपिक गेम्सची फोर्टनाईट गेम सुद्धा मोफत उपलब्ध असून गेले कित्येक महीने सगळीकडे या गेमची चर्चा होती. या गेमने लोकप्रियेतेचे उच्चांक गाठत पीसी व प्लेस्टेशन, एक्सबॉक्सवर पब्जीला बरच मागे टाकलं होतं. पब्जी पीसीवर ९९९ रुपयास उपलब्ध असून फोन्सवर असलेली पब्जी मोबाइल मात्र मोफत उपलब्ध आहे. भारतात पीसी किंवा कन्सोल गेमिंग फारच कमी प्रमाणात वापरलं जातं त्यामुळे पीसी व्हर्जन्सची चर्चा आपल्याकडे फारशी पाहायला मिळत नाही. फोन्स मात्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पब्जी मोबाइल इतर ठिकाणांपेक्षा भारतात अधिक यशस्वी ठरली. काही महिन्यात अपेक्स लेजंड्ससुद्धा अँड्रॉइडवर उपलब्ध झाल्यास आश्चर्य वाटायला नको…

अपेक्सला अल्पावधीतच मिळालेल यश नक्कीच मोठं आहे मात्र त्यांना फोर्टनाईटला मागे टाकण्यास बराच अवकाश आहे. फोर्टनाईट सध्या 20 कोटी गेमर्स खेळतात! मात्र अनेक स्ट्रिमर्सकडून मिळालेला चांगला प्रतिसाद सामान्य गेमर्सनाही फोर्टनाईट पासून दूर नेऊ शकतो…बरेच महीने फोर्टनाईट सारखी गेम पुन्हा पुन्हा खेळून अनेकांना कंटाळा आल्याचही चित्र पाहायला मिळत आहे! सर्वात लोकप्रिय गेम स्ट्रिमर निंजाने सुद्धा गेले कित्येक दिवस फोर्टनाईट स्ट्रिम केलेली नाहीय! बरेच श्राउड (Shroud) सुद्धा पब्जी सोडून अपेक्सकडे वळल्याच दिसत आहे! लवकरच या गेममध्येही Solo, Duos मोड्स उपलब्ध होणार आहेत…

Search Terms EA Games Respawn Entertainment Apex Legends Crosses 25 million players!

Exit mobile version