अॅपलवर एयरपॉवर रद्द करण्याची नामुष्की!

हा वायरलेस चार्जर अपेक्षित स्टँडर्ड्स पूर्ण कर्त नसल्याची कबुली!

अॅपलने सप्टेंबर २०१७ मध्ये iPhone X सादर करताना AirPower हा वायरलेस चार्जर जाहीर केला होता. त्यावेळी २०१८ मध्ये तो उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र आता मार्च २०१९ मध्ये अॅपलने सध्याच्या स्टँडर्डनुसार उपकरण बनवणं शक्य न झाल्यामुळे एयरपॉवर कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला आहे.

AirPower हा असा वायरलेस चार्जर आहे (किंवा होता) ज्याद्वारे तीन उपकरणे एकाचवेळी वायरशिवाय चार्ज करता येतात. उदा अॅपल आयफोन, अॅपल वॉच, एयरपॉड हे सर्व एकाच वेळी एयरपॉवरच्या पॅडवर ठेऊन वायरशिवाय चार्ज करता येतात. यासाठी अनेक कॉइल्सचा वापर करण्यात आला होता आणि ज्यामुळे या पॅडवर कुठेही आपलं उकरण ठेवलं तरी ते चार्ज होईल असं सांगण्यात आलं होतं! यासोबत चार्जिंग सुरू असलेल्या तिन्ही उपकरणांची बॅटरी लेव्हल आयफोनवर एकाचवेळी दिसेल! मात्र अॅपलला अठरा महिन्यांनीही हा चार्जर पूर्णतः बनवता आला नाहीच. हे उपकरण फार जास्त गरम होत असल्याची चर्चा सुरू झाली होती. अगदी गेल्या आठवड्यात सादर उपलब्ध झालेल्या Apple AirPod 2 च्या बॉक्सवरही या एयरपॉवरचा उल्लेख पाहायला मिळतोय! आता तो उल्लेख करण्याची घाई तरी अॅपलने का म्हणून केली असेल हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मात्र हे सगळं थांबलं असून अॅपलने अधिकृतरित्या याबद्दल भूमिका स्पष्ट केली असून आमच्या उत्कृष्ट उत्पादनाच्या कसोटीवर हे उपकरण यशस्वी होत नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याच टेकक्रंचकडे सांगण्यात आलं आहे. अनेक जण या चार्जरची आवर्जून वाट पाहत होते मात्र आता त्यांच्या हातात अॅपलकडून पुन्हा एकदा निराशा आली आहे..!

अॅपल एयरपॉवरबद्दलचा व्हिडिओ


Exit mobile version