पब्जी मोबाइल आता सहा तासच खेळता येणार : भारतीयांना बंधन!

कालच आम्ही प्रसिद्ध केलेल्या या लेखानंतर आज आलेल्या माहितीनुसार फक्त भारतामधील पब्जी मोबाइल यूजर्ससाठी एका दिवसात सहा तास गेम खेळता येण्याचं बंधन घालण्यात आलं आहे! गेल्या काही महिन्यात या गेममुळे येणार्‍या समस्या पाहून पब्जीतर्फे हा निर्णय घेण्यात आला असावा.

हा लेख नक्की वाचा पब्जी मोबाइलला १ वर्ष पूर्ण! : बॅनची मागणी कितपत योग्य?

या गेमच्या हट्टापायी विद्यार्थ्यांकडून घडणारे गैरप्रकार समोर आले जसे की पब्जी साठी नवा फोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या, रेल्वे ट्रॅकवर खेळत बसले असतं दोघांना रेल्वे अपघातात आलेलं मरण, लक्ष नसल्यान पाण्याऐवजी अॅसिड पिणे, इ. या पार्श्वभूमीवर या गेमवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली. गुजरातमध्ये काही ठिकाणी तर ही अंमलात आणली गेली असून जवळपास १६ जणांना अटकही झाली आहे!

आता अशा घटनांना थांबवता यावं म्हणून पब्जीकडून प्रथमच पाऊल उचलण्यात आलं असून आता जर एखादा यूजर सलग सहा तास गेम खेळत असेल तर त्याला बॅनरद्वारे असं सांगितलं जाईल की यापुढे तुम्हाला ही गेम अमुक वेळेपर्यंत खेळता येणार नाही. याला प्ले टाइम रेस्ट्रीक्शन म्हटलं जाईल. तसेच दोन आणि चार तासांनीही आधीच वॉर्निंग देण्यात येईल! मग सहाव्या तासाला गेम थेट बंदच करावी लागेल.

याबाबत पब्जी तर्फे अधिकृतरित्या माहिती अद्याप देण्यात आलेली नाही मात्र असे स्क्रीन शॉट्स अनेकांनी शेयर केले आहेत. तुम्हाला वाटेल की सलग सहा तास कोण गेम खेळत बेसल पण खरच या गेम इतक वेड लागलं आहे की अनेक विद्यार्थी दिवसभर गेम खेळत बसल्याचीही उदाहरणे आहेत!

Exit mobile version