शायोमीचा ब्लॅक शार्क २ गेमिंग स्मार्टफोन : आता अधिक सुविधांसह!

शायोमीच्या ब्लॅक शार्क या गेमिंगसाठी खास बनवलेल्या फोनची नवी आवृत्ती असलेला फोन Black Shark 2 आज जाहीर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.39″ इंची OLED डिस्प्ले असून त्यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा देण्यात आला आहे. यामध्ये आणखी एक खास जोड देण्यात आली आहे ती म्हणजे प्रेशर सेंसिटीव्ह सिस्टिम जी आपल्याला डिस्प्लेच्या कोपर्‍यावरील जागी अधिक दाब देताच कृती करण्यासाठी बटणे उपलब्ध करून देते ज्याचा उपयोग गेमिंग दरम्यानही होईल!

शायोमीने या फोनचा डिस्प्ले गेमिंगसाठी सुधारून अधिक अचूक रंग, कमी स्क्रीन फ्लिकर अशा प्रकारचे बदल केले आहेत. Snapdragon 855 प्रोसेसर, 4000mAh बॅटरी, 12GB रॅम, 27W फास्ट चार्ज सपोर्ट! इत्यादी जोरदार सुविधा देण्यात आल्या आहेत! यामध्ये पाठीमागे 48MP आणि 12MP असे कॅमेरे देण्यात आले आहेत तर फ्रंट कॅमेरा 20MP आहे. यामध्ये गेमिंगवेळी वाढणारं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी vapor chamber cooling system देण्यात आली आहे. अशा सिस्टममुळे PUBG सारख्या गेम्स खेळताना फोन गरम होणार नाही. सोबत याला एक ग्रीप उपलब्ध आहे जी गेमिंग अधिक सोपं करेल.

Xiaomi Black Shark 2 Specs
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855
डिस्प्ले : 6.39-inch AMOLED at 1080×2340 pixels, input latency 43.5ms, HDR
रॅम : 6GB/8GB/12GB
स्टोरेज : 128GB/256GB
फ्रंट कॅमेरा : 20MP f/2.0
मुख्य कॅमेरा : 12MP f/1.7 + 12MP f/2.2
Cooling : Direct touch multilayer liquid cooling system
बॅटरी : 4,000mAh
इतर : In-display fingerprint scanner, pressure sensitive display
किंमत : 6GB+128GB $475(~₹३३०००) 12GB+256GB ~$625 (~₹४३०००)

या फोनची कमी किंमत आणि जास्त सुविधा पाहता हा फोन भारतातही लवकरच सादर केला जाऊ शकतो. सध्याचं चीनी स्मार्टफोन्स भारतीय स्मार्टफोन बाजारातील वर्चस्व पाहता अशा गेमिंग फोन्सची इतर कंपन्याही सादर करण्याची शक्यता आहे. असे प्रयत्न यापूर्वी एसुसरेझर यांनी केले आहेत.

Exit mobile version