कॅननचा नवा DSLR सादर : EOS Rebel SL3 250D

सध्या मिररलेस कॅमेरांचं वारं वेगात वाहत असताना कॅननने आपल्या DLSR वरुन लक्ष दूर केलं नसल्याचं दाखवून देत आज DLSR कॅमेरा जाहीर केला आहेत! याचं नाव EOS Rebel SL3/250D असं असणार आहे.

हा कॅमेरा 24.1-megapixel APS-C सेन्सर असलेला आजवरचा सर्वात लहान आणि हलका EOS कॅमेरा ठरला आहे. यामधील सुविधा बर्‍यापैकी EOS M50 या मिररलेस कॅमेरासारख्याच आहेत. DIGIC 8 processor, 3.0 inch flip-around touchscreen आणि 4K video. EOS मालिकेमधील हा असा पहिलाच कॅमेरा आहे ज्यात Dual Pixel autofocus with eye detection मिळेल (मात्र Live View Mode मध्येच)

Image Sensor : 22.3 mm x 14.9 mm CMOS
Effective Pixels : 24.10 megapixels
प्रोसेसर : DIGIC 8
Lens Mount : EF mount
AF System/ Points : Via optical viewfinder: 9-point Center AF point
Speed : 30-1/4000 sec (1/2 or 1/3 stop increments)

Rebel SL3 / EOS 250D एप्रिल महिन्याच्या अखेरीस खरेदीसाठी उपलब्ध होईल. याची किंमत $599.99 (Body) असेल. Body+ EF-S 18-55 f/4-5.6 IS STM ची किंमत $749.99 अशी असेल.

https://youtu.be/6Xoo8MclmOI
Exit mobile version