माइनक्राफ्टची मूळ आवृत्ती आता ब्राऊजरवर मोफत उपलब्ध!

माइनक्राफ्ट या प्रसिद्ध गेमला दहा वर्षे पूर्ण होत असून सध्या ७.४ कोटी लोक दरमहा ही गेम खेळत आहेत! मायक्रोसॉफ्टने २०१४ मध्ये माइनक्राफ्टची डेव्हलपमेंट पाहणार्‍या मोजांग कंपनीचं तब्बल 2.5 बिलियन डॉलर्स खर्चून अधिग्रहण केलं होतं! माइनक्राफ्ट अजूनही सर्वाधिक कॉपी विकलेल्या पीसी गेम्समध्ये आघाडीवर आहे.

तर ही गेम ज्यावेळी सर्वात आधी उपलब्ध झाली होती तेव्हाची म्हणजे २००९ ची आवृत्ती Minecraft Classic आता वेब ब्राऊजरवर उपलब्ध करून देण्यात आली आहे ती सुद्धा मोफत! या वेब आवृत्तीमध्ये फार पर्याय नसले तरी भविष्यात अशा प्रकारे माइनक्राफ्ट वेबवर उपलब्ध होऊ शकेल यादृष्टीने चांगलं पाऊल म्हणता येईल. तूर्तास जुन्या आठवणींना उजाळा देणं एव्हढाच या आवृत्तीचा उद्देश आहे!

Minecraft Classic Link : https://classic.minecraft.net

ब्लॉक्स वापरुन आपल्या कल्पना शक्तीला वाव देत ही गेम हव्या त्या प्रकारे खेळता येते! यामुळे मेंदूला चालना मिळत असल्याचही अनेक संशोधनांमध्ये सांगण्यात आलं असून विद्यार्थ्यांना कोडिंग शिकवण्यासाठीही या गेमचा वापर करण्यात येत आहे. ही गेम पीसी, प्लेस्टेशन, एक्सबॉक्स, अँड्रॉइड, iOS वर उपलब्ध आहे!

मोजांग स्टुडिओने माइनक्राफ्टच्या दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त #MineCraftMemories वापरुन आपल्या माइनक्राफ्ट गेममधील आठवणी शेअर करण्यास प्रोत्साहन दिलं असून याद्वारे त्यांच्या वेबसाइटवरही स्थान मिळू शकेल!

Search Terms Mojang releases Minecraft Classic as browser based game

Exit mobile version