विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

मायक्रोसॉफ्टतर्फे भारतीय भाषांच्या फोनेटिक कीबोर्डचा विंडोज १० मध्ये समावेश!

मायक्रोसॉफ्टने विंडोज १० च्या नव्या मे २०१९ अपडेटमध्ये दहा भारतीय भाषांसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड उपलब्ध करून दिले आहेत! यामुळे विंडोज १० या डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टिमवर मराठी भाषेत टाइप करणं आता आणखी सोपं होणार असून यासाठी बाहेरून कोणतंही टूल डाऊनलोड करावं लागणार नाही!

हे नवे स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड यूजर्सच्या टायपिंगच्या सवयींचा अभ्यास करून भारतीय भाषांमध्ये आपोआप पुढे टाइप केला जाणारा शब्द सुचवेल आणि त्यामुळे टाइप करताना लागणारा वेळ वाचेल. हे कीबोर्ड ट्रान्सलिटरेशन (Transliteration) प्रकारचे असल्यामुळे आपण मराठी शब्दांचं इंग्रजी स्पेलिंग लिहिलं की त्याचं रूपांतरण होऊन तो शब्द मराठीत टाइप झालेला दिसतो! यामुळे विशिष्ट अक्षर/शब्दासाठी विशिष्ट बटणे लक्षात ठेवावी लागत नाहीत! उदा. solapur असं लिहिलं की सोलापूर असं टाइप झालेलं दिसेल. paryay असं लिहिलं की पर्याय असं टाइप झालेलं दिसेल!

विंडोज १० मे अपडेट मधील स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड
मराठी भाषेत कसा वापरायचा?

  1. प्रथम तुमच्या कम्प्युटरवर विंडोज १० च्या Windows 10 May 2019 या अपडेटद्वारे अपडेट किंवा इंस्टॉल करून घ्या ( यासाठी आमचा हा व्हिडिओ पाहू शकता)
  2. Settings उघडा त्यानंतर Time & Language
  3. डाव्या बाजूला Language पर्याय दिसेल तो निवडा
  4. आता Add a preferred language वर क्लिक करा
  5. Choose a languege to install खाली Marathi असं लिहून सर्च करा
  6. मराठी निवडून Install Language Features आल्यावर Install वर क्लिक करा
  7. आता आपणा Step 3 मध्ये पाहिलेल्या मेनूवर परत आलेलो आहोत
  8. आता Marathi वर क्लिक करा आणि Options निवडा
  9. आता Add a Keyboard वर क्लिक करा
  10. इथे Marathi Phonetic हा पर्याय निवडा.
  11. तुमचा कम्प्युटर आता मराठी भाषेत टायपिंगसाठी तयार आहे…!
  12. इथून पुढे ज्या ज्या वेळी मराठी भाषेत टाइप करायचं आहेत तेव्हा कर्सर जिथे टाइप करायचं आहे तिथे ठेऊन उजव्या कोपर्‍यात खाली Marathi Phonetic निवडा.

हे कीबोर्ड लेआऊट यूनिकोड (Unicode) आधारित असल्यामुळे सर्व सॉफ्टवेअर, ब्राऊजर, अॅप्लिकेशन्समध्ये सहज टाइप करू शकतील आणि याद्वारे टाइप केलेला मजकूर कोणत्याही अतिरिक्त फॉन्ट इंस्टॉल न करता सर्वत्र व्यवस्थित पाहता येईल! भारतीय भाषांमधील अक्षरे, अंक, शब्द टाइप करा ते सुद्धा अचूक व २०% अधिक वेगाने!

हे कीबोर्ड मायक्रोसॉफ्टने मराठी, बांगला, तामिळ, तेलुगू, कन्नड, पंजाबी, हिंदी, गुजराती, ओडिया व मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. यापूर्वी मायक्रोसॉफ्टचं Microsoft Indic Language Input Tool (ILIT) वापरावं लागत होतं मात्र ते बरेच दिवस अपडेट न झाल्यामुळे त्यामध्ये आता अडचणी येत होत्या. मायक्रोसॉफ्टने थेट विंडोज १० मध्येच ही सोय दिल्यामुळे सर्व गोष्टी सहजसोप्या झाल्या आहेत. यानंतर कुठल्याही प्रकारची Input Method Editors (IMEs) डाऊनलोड करत बसायची गरज नाही. विंडोज १० मे अपडेटमध्येच या सुविधा थेट समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे मराठी किंवा इतर भारतीय भाषांचा कम्प्युटरवर वापर नक्की वाढेल यात शंकाच नाही…!

इतर पर्याय
– Microsoft ILIT Marathi : https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx

Search Terms : New, Improved and Easy way for Marathi typing on Windows 10 computer
Microsoft adds smart Phonetic Indic keyboards in 10 Indian languages for Windows 10

Exit mobile version