PUBG Lite ची नोंदणी भारतात सुरु : सोबत मोफत स्किन्सची भेट!

पब्जी मोबाइलला मिळालेला प्रतिसाद आता आपणा सर्वांपर्यंत पोहोचलाच असेल. पण या गेमची पीसी आवृत्ती त्याआधी लोकप्रिय होती हे अनेकांना आता ठाऊक नाही. पीसी आवृत्तीपेक्षा फोन आवृत्तीच अधिक प्रसिद्ध झाल्याचं चित्र प्रथमच पाहायला मिळालं. पब्जीची कॉम्पुटरसाठी असणारी गेम त्या मानाने चांगली नव्हती आणि ते खेळण्यासाठी बऱ्यापैकी चांगलं हार्डवेअर असलेला पीसी किंवा लॅपटॉप लागायचा. मात्र मध्यंतरी अनेकांनी PUBG Mobile Emulator द्वारे हौस भागवून घेतली. आता PUBG PC चीच कमी क्षमता असलेल्या कॉम्प्युटर्ससाठी नवी PUBG Lite ही आवृत्ती येते आहे! ही आवृत्ती विंडोज पीसीवर मोफत उपलब्ध असणार आहे!

PUBG Lite अधिकृत लिंक : https://lite.pubg.com

PUBG Lite सध्या थायलंडमध्येच उपलब्ध असून आता आशिया, युरोप, अमेरिका अशा सर्वच ठिकाणच्या देशांमध्ये लवकरच उपलब्ध होत आहे. भारतातही यासाठी नोंदणी सुरु झाली असून ही प्रक्रिया ३ जुलै पर्यंत चालेल. या दरम्यान नोंदणी करणाऱ्या यूजर्सना विविध स्किन्सचे कुपन कोड्स इमेलद्वारे पाठवले जाणार आहेत! याबद्दल त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर माहिती दिली आहे.

PUBG Lite च्या या चाचणीसाठी नोंदणी करणाऱ्या सर्व प्लेयर्सना Tiger M416 बंदूक आणि चित्त्याची पॅराशूट स्किन मिळेल. प्रथम १००००० पर्यंत नोंदणी झाल्यास सर्वाना काळा स्कार्फ, पंक ग्लासेस, आणि कॉम्बॅट पँट्स मिळणार आहेत. जर २००००० पर्यंत नोंदणी झाली तर gold PUBG scarf, yellow-black striped long-sleeved shirt आणि red sports top मिळेल.

Exit mobile version