पब्जी मोबाइल 0.13.0 अपडेट आता उपलब्ध : नवा डेथमॅच मोड!

सध्या लोकप्रिय असलेल्या पब्जी मोबाइल गेमचं नवं अपडेट 0.13.0 आजपासून उपलब्ध झालं असून हे आता गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर डाऊनलोड करता येईल. या अपडेटची डाऊनलोड साइज जवळपास 2GB असेल (Android – 1.98GB & iOS 2.45GB). या नव्या अपडेटमध्ये गॉडझिला किंग ऑफ मॉन्स्टर्स या चित्रपटाच्या भागीदारीसह तयार केलेली डिझाईन्स, नवी बायझन बंदूक, Kar98 स्कीन, नवे कपडे व स्कीन्स आणि 4v4 मॅप असलेला डेथमॅच मोड जोडण्यात आला आहे!

नव्या Deathmatch Mode मध्ये चार प्लेयर्सच्या दोन स्क्वाड्स छोट्या मॅपवर एकमेकांशी लढतील. यामध्ये तुम्ही मेल्यावर respawn करत लगेच पुन्हा संधी दिली जाईल. तुम्ही एका शत्रूला मारल्यास एक गुण मिळेल. चाळीस गुण प्रथम मिळवणारा संघ विजेता ठरेल.

PUBG Mobile तर्फे जाहीर करण्यात आलेल्या 0.13.0 पॅच नोट्स :

इतर बदल

  1. The old zombies have been replaced by 4 types of new zombies
  2. Liquid Nitrogen Grenades now leave behind a cloud of freezing smoke on the ground for a long period after explosion, reducing the movement speed of any unit in the area
  3. Added new mode combat modifiers
  4. Certain zombies now have new abilities: Tanks will empower nearby allies; Skinners can slow nearby players
  5. A new factory has replaced the police station
Exit mobile version