DJI Ronin SC सादर : मिररलेस कॅमेरासाठी नवं स्वस्त गिंबल!

DJI या प्रसिद्ध ड्रॉन कंपनीने गिंबल बनवण्यात सुद्धा आघाडी घेतली असून आता त्यांनी खास कमी वजनाच्या मिररलेस कॅमेरासाठी कमी वजनाचा गिंबल सादर केला आहे. याचं नाव Ronin SC असं असून याची किंमत $439 (~₹३१०००) आहे. खास मिररलेस कॅमेराना समोर ठेऊन हा गिंबल तयार करण्यात आला असल्याच सांगण्यात आलं आहे.

गिंबल (Gimbal) हे उपकरण कॅमेराद्वारे व्हिडिओ काढत असताना कॅमेराची हालचाल स्थिर करून चांगल्या व सहज स्वरूपात शूटिंग करता यावं म्हणून वापरलं जातं. यांना stabilizer सुद्धा म्हटलं जातं. यामुळे व्हिडिओ स्टेबल, स्मूथ, शेक नसलेला शूट होतो. आता मोठ्या कॅमेरासोबत फोन्ससाठीही गिंबल उपलब्ध आहेत.

Ronin SC हा 3 axis गिंबल असून यावर नियंत्रण करण्यासाठी जॉयस्टिक आणि काही बटन्स देण्यात आले आहेत. सोबत तुम्ही तुमच्या फोनद्वारेही वायरशिवाय याचं नियंत्रण करता येईल. या द्वारे फोकस रिंगचीही सुविधा Ronin SC Pro द्वारे देण्यात येत आहे.

DJI ने या गिंबलला वजनाने सर्वात हलका, लहान आणि सर्वात हुशार स्टॅबिलायझर असं म्हटल आहे! यामध्ये ट्रॅकिंगसुविधा सुद्धा आहे. DJI च्या अॅपमध्ये ऑब्जेक्ट सिलेक्ट करायची आणि मग गिंबल त्या ऑब्जेक्टला ट्रॅक करत कॅमेरा त्या दिशेने फिरवत राहील! याची बॅटरी लाईफ जवळपास ११ तास असेल. हा अंदाजे २ किलो पर्यंत वजन असलेल्या कॅमेरा+लेन्सना ऑपरेट करू शकेल!

Exit mobile version