सोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा!

सोनीने काही तासांपूर्वी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांचा नवा फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा सादर केला असून हा कॅमेरा आजवरचा जगातला पहिलाच कॅमेरा आहे ज्यामध्ये तब्बल 61MP चा (होय ६१ मेगापिक्सल्सचा) फुलफ्रेम सेन्सर देण्यात आला आहे!शिवाय हा कॅमेरा Burst मोड मध्ये 10fps पर्यंत फोटो काढू शकेल आणि १५ स्टॉप्स पर्यंतची डायनॅमिक रेंज असेल!

यामध्ये असलेला BSI CMOS Sensor नव्याने बनवण्यात आलेला असून यामुळेच या कॅमेरामध्ये १५ स्टॉप पर्यंत डायनॅमिक रेंज साधता येईल! तसेच 61MP च्या फोटोनेही समाधान होणार नसेल तर नव्या sensor shift multi shot द्वारे १६ स्वतंत्र फोटो एकत्र करून कॅमेरामध्येच एक 240MP चा फोटो मिळतो! ज्यामध्ये तब्बल 963.2 million पिक्सेल डेटा साठवलेला असेल!

या कॅमेराच्या क्रॉप मोड (APSC) मध्ये जरी शूट करायच ठरवलं तरी तो 26MP रेजोल्यूशनमध्ये शूट करू शकतो! सोनीने याला सर्वाधिक रेजोल्यूशन असलेला APSC कॅप्चर म्हटलं आहे! ऑटोफोकसच्या बाबतीतसुद्धा हा कॅमेरा सर्वात पुढे निघाला आहे. तब्बल 567 phase detection ऑटो फोकस पॉईंट्स आहेत. फुलफ्रेम मोडमध्ये ७४% इमेज एरिया कव्हर करू शकेल! सोबत Eye AF, Animal Eye AF, Real Time Tracking सुद्धा आहेच.

Sony a7R IV Specs

Exit mobile version