Sony RX100 VII सादर : नवा सेन्सर, वेगवान कामगिरी आणि माइक जॅकसुद्धा!

Sony RX100 VII

सोनीने त्यांची प्रसिद्ध पॉइंट अँड शूट मालिका RX100 अंतर्गत नवा कॅमेरा सादर केला असून यामध्ये सुधारित ट्रॅकिंग व ऑटोफोकस सुविधा जोडण्यात आल्या आहेत ज्या सध्या फुलफ्रेम कॅमेरा A9 मध्ये पाहायला मिळतात. यासोबत यावेळी माइक पोर्ट देण्यात आला आहे जो व्लॉगर्सना नक्कीच उत्तम पर्याय असेल. यामध्ये Single Burst Shooting द्वारे तब्बल 90FPS शूट करू शकतो! 24–200 mm लेन्स मुळे बऱ्यापैकी झुम रेंज सुद्धा मिळते.

सोनीच्या या कॅमेरामध्ये stacked CMOS image sensor असून 20fps वेगात ब्लॅकआउट फ्री फोटो काढता येतील! अलीकडे आलेल्या A6400, a7RIV मध्ये असलेलं सर्वात वेगवान ऑटो फोकस तंत्रज्ञान आता या छोट्याश्या पॉइंट अँड शूट कॅमेरामध्येही मिळेल! सोबत real time EyeAF, Tracking Features, 327 phase detection points, 425 contract detection points, touch tracking, 4K HDR with HLG profile, Optical SteadyShot, tiltable screen अशा सुविधा मिळणार आहेतच!

या कॅमेराची किंमत जवळपास $1200 (~₹८३०००) असेल असं सांगण्यात आलं आहे. भारतीय किंमत यापेक्षा अधिक असेल. हा कॅमेरा ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होण्यास सुरुवात होईल.

Sony RX100 VII Specs

Exit mobile version