अॅपल वॉच सिरीज ५ सादर : आता नेहमी सुरू राहणारा डिस्प्ले!

अॅपलने काल झालेल्या कार्यक्रमात नवे आयफोन्स, आयपॅडसोबत अॅपल वॉचची पुढची आवृत्तीसुद्धा सादर केली आहे. आता यामध्ये चक्क नेहमी सुरू राहणारा Always On डिस्प्ले देण्यात आला आहे! यामुळे आपल्याला टॅप न करता किंवा हात न उचलतासुद्धा वेळ दिसेल. याआधी बॅटरी वाचावी म्हणून ही सुविधा स्मार्टवॉचमध्ये देण्यात आली नव्हती मात्र आता ही सोय जोडण्यात आली असून यासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे बॅटरीवर सुद्धा फरक पडणार नाही असं अॅपलने सांगितलं आहे. इंटरनॅशनल इमर्जन्सी कॉलिंगची सोय देण्यात आली असून ही सोय १५० देशांमध्ये कुठेही मोफत वापरता येणार आहे तीसुद्धा आयफोन जवळ नसताना! या नव्या Apple Watch Series 5 साठी अनेक नवे पर्याय देण्यात आले आहेत. वेगवेगळे रंग, बॅंड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आधीच्या Apple Watch Series 4 प्रमाणेच यामध्येही ECG पाहता येणार आहे! ते पाहण्यासाठी आणखी आकर्षक पर्याय देण्यात आले आहेत. नॉईस अॅपद्वारे आपल्या आजूबाजूला आवाज वाढत असल्याचं लगेच सांगण्यात येईल. शिवाय आता सायकल ट्रॅकिंगसुद्धा उपलब्ध! आता कंपासचा सुद्धा समावेश ज्यामुळे दिशांबद्दल अचूक माहिती मिळेल! आता फोन करणं, गाणी ऐकणं सुद्धा शक्य!

अॅपल वॉच सिरीज ५ भारतीय किंमत :
Apple Watch Series 5 (GPS) ₹40,900
Apple Watch Series 5 (GPS + Cellular) ₹49,900.

https://youtu.be/5bvcyIV4yzo
Exit mobile version