अॅपलचे AirPods Pro सादर : आता Active Noise Cancellation सह!

अॅपलने काल नवे वायरलेस इयरफोन्स सादर केले असून यांना AirPods Pro एयरपॉड्स प्रो असं नाव देण्यात आलं आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये Active Noise Cancellation चा समावेश आहे. या सुविधेमुळे बाहेरचा आवाज कमी होतो आणि आपण इयरफोन्स द्वारे ऐकत असलेली गाणीच स्पष्ट ऐकू ऐकू येतात. यांची किंमत $249 (~१८०००) असून हे ३० ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील.

अपडेट : अॅपल AirPods Pro आता भारतात उपलब्ध झाले असून यांची किंमत ₹२४९०० असणार आहे

AirPods Pro मधील मायक्रोफोन बाहेरील आवाज ओळखून तो बाजूला करतात आणि त्यामुळे आपल्याला आपण ऐकत असलेली गोष्टच फक्त ऐकता येईल. समजा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर इतर कोणताही आवाज न येता केवळ तुमच्या कॉलचाच आवाज तुम्हाला ऐकू येईल. ही आहे Active Noise Cancellation ची कमाल! एव्हढया एका सोयीची विशेष जोड देऊन अॅपलने त्यांच्या एयरपॉड्सना ‘प्रो’ बनवलं आहे.

यामध्ये असलेल्या फोर्स सेन्सरद्वारे आपण यांना स्पर्श करून गाणी नियंत्रित करू शकतो. तसेच यामध्ये असलेल्या Adaptive EQ मुळे खास तुमच्या कानाला साजेसं म्युझिक ऐकू येईल! नव्या मॉडेलमध्ये एयर टिप्सचाही समावेश करण्यात आला असून आधीच्या मॉडेल्समध्ये इयरटिप्स नव्हत्या. तीन प्रकारच्या इयरटिप्स बॉक्समध्ये मिळतील. तुमच्यासाठी योग्य इयरटिप्स वापरत आहात का हे पाहण्यासाठी अॅपलने एका सॉफ्टवेअर टेस्टचा सुद्धा दिली आहे!

AirPods Pro Features :

https://youtu.be/IC9urbiVp4M
Exit mobile version