गोप्रो Hero 8 अॅक्शन कॅमेरा व MAX 360 कॅमेरा सादर!

अॅक्शन कॅमेरासाठी प्रसिद्ध असलेल्या गोप्रोने त्यांच्या हिरो मालिकेत नवा Hero 8 कॅमेरा आणला असून सोबत एक नवा 360° फोटो,व्हिडिओ काढणारा मॅक्स (GoPro Max) सादर केला आहे! Hero 7 मध्ये देण्यात आलेल्या HyperSmooth स्टॅबिलायझेशनमुळे स्थिर व्हिडीओ काढणं सोपं झालं होतं. आता याच्या पुढच्या आवृत्तीचा गोप्रो हिरो ८ ब्लॅकमध्ये समावेश करण्यात आला आहे यामुळे हालचाल जास्त असलेला व्हिडीओ रेकॉर्ड करतानासुद्धा आणखी स्थिर/स्टेबल व्हिडीओ काढता येतील! हा कॅमेरा २० ऑक्टोबरपासून मिळणार असून याची किंमत ₹३६५०० असणार आहे. नव्या गोप्रोसाठी आता बाहेरून हवे ते मॉड्स जोडता येणार आहेत. यामध्ये लाईट मॉड, डिस्प्ले मॉड आणि मीडिया मॉड सध्या उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यावेळी नव्याने सादर करण्यात आलेला कॅमेरा गोप्रो फ्युजनची सुधारित आवृत्ती म्हणता येईल. याचं नाव गोप्रो मॅक्स (GoPro Max) असं असेल. यामध्येही माऊंट करण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे. दोन लेन्सद्वारे 360° फोटो, व्हिडिओ काढता येतील. सोबत सहा माइक असल्यामुळे ऑडिओसुद्धा 360° रेकॉर्ड होईल. या कॅमेरात एकावेळी एक लेन्स वापरता येईल जो पर्याय पूर्वी उपलब्ध नव्हता. या नव्या पर्यायामुळे गोप्रो मॅक्स हा गोप्रो हिरो प्रमाणे अॅक्शन कॅमेरा म्हणून सुद्धा वापरू शकाल! हा कॅमेरा २४ ऑक्टोबरपासून उपलब्ध होत असून याची किंमत ₹४७००० असेल.

Hero 8 मध्ये सुद्धा काही बदल करण्यात आले असून पुढे असलेल्या मायक्रोफोनमधून अधिक चांगला आवाज रेकॉर्ड होईल. मीडिया मॉडचा वापर करून हा कॅमेरा आता व्लॉगिंगसाठीसुद्धा वापरता येईल! मीडिया मॉड $79.99 (~₹५६८०) उपलब्ध असेल. आता या नव्या मॉडेलमध्ये आधीच्या गोप्रो प्रमाणे बाहेरून माइक जोडता येईल जो पर्याय गेल्या काही मॉडेल्समध्ये देण्यात आला नव्हता. डिस्प्ले मॉड मुळे दुसरा डिस्प्ले उपलब्ध होईल जो पुढे किंवा मागे फिरवता येईल ज्यामुळे व्लॉग करणं सोपं जाईल. याची किंमत $79.99 (~₹५६८०) आहे. तिसऱ्या लाइट मॉडद्वारे एक्सटर्नल एलईडी लाइट्स मिळतील ज्यामुळे कमी उजेडात व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. हा मॉड १० मीटरपर्यंत पाण्यात वापरता येऊ शकतो. याची किंमत $49.99 (~₹३५४०) आहे.

माऊंट करण्यासाठी असलेला पर्याय आता थेट कॅमेराखालीच जोडल्यामुळे तो वेगळा जोडावा लागणार नाही. ही सोय नक्कीच अनेकांना आवडणार असून यामुळे अतिरिक्त लावावा लागणार माऊंट ब्रॅकेट आता लागणार नाही. या कॅमेराद्वारे 4K 60fps मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. स्लोमोसाठी 1080p 240fps पर्याय आहे. सुधारित स्टॅबिलायझेशन आणि टाइम वार्पमुळे आणखी भन्नाट व्हिडिओ रेकॉर्ड करू शकाल. गोप्रो मॅक्स हा कॅमेरा ५ मीटरपर्यंत वॉटरप्रूफ असेल. याद्वारे 5.6K रेजोल्यूशनचा 30fps 360° व्हिडिओ काढता येईल!

Search Terms GoPro launches new action camera Hero 8 Black with HyperSmooth 2 TimeWarp 2 Stabilized Video GoPro Max 360 camera launched with option to switch to action camera!

Exit mobile version