Ryzen 9 3950X सादर : एएमडीने पुन्हा एकदा इंटेलला मागे टाकलं!

AMD आणि इंटेलची गेल्या काही वर्षात वाढलेली तीव्र स्पर्धा आता इतकी वेगळ्या पद्धतीने सुरू आहे की AMD इंटेलच्या बरीच पुढे निघून आली आहे म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे. इंटेलच्या तुलनेत जवळपास सर्वच बेंचमार्क्समध्ये AMD Ryzen मालिकेतील प्रोसेसर्स सरस ठरत असल्याचे दिसून येत आहे. गेमिंग एक असा विषय होता ज्यामध्ये AMD थोडीशी मागे पडत होती मात्र आता ती सुद्धा उणीव भरून काढत त्यांनी नवे प्रोसेसर्स खास गेमर्सना समोर ठेऊन सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हा नवा Ryzen 9 3950X प्रोसेसर आणला असून हा जगातला सर्वात शक्तिशाली 16 Core डेस्कटॉप प्रोसेसर आहे! या प्रोसेसरमध्ये ३२ थ्रेड्स आहेत. बेस क्लॉक स्पीड 3.5Ghz असून ओव्हरक्लॉक केल्यास 4.7GHz पर्यंत जाऊ शकेल!

सध्या सुरू असलेल्या ब्लॅक फ्रायडे सेलमुळे हा प्रोसेसर सादर झाल्या झाल्या इतक्या वेगाने विकला गेला की आता जवळपास सर्व ठिकाणी हा आउट ऑफ स्टॉक झाला आहे! गेमर्स, क्रिएटर्स मंडळींमध्ये या प्रोसेसरची प्रचंड मागणी दिसून येत आहे. सध्या या सेलदरम्यान Amazon वर सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या प्रोसेसर्समध्ये पहिले दहा प्रोसेसर्स हे AMD चेच आहेत. इंटेलला प्रोसेसर विश्वात AMD Ryzen च्या यशामुळे धक्के बसण्यास सुरुवात झाली होतीच मात्र आता इंटेलला मागे टाकून एएमडी पुढे निघून चालली आहे. याचं बऱ्यापैकी श्रेय AMD च्या सध्याच्या प्रमुख असलेल्या डॉ. लिसा सू यांना द्यावं लागेल. त्यांच्या नेतृत्वात अनेक वर्षं अशक्य वाटणारी गोष्ट AMD करत आहे. प्रोसेसरची कमी किंमत आणि मिळणाऱ्या अधिक सुविधा लक्षात घेता सर्वांची एनआयडी AMD असल्यास वेगळं वाटू नये. शिवाय AM4 हा प्लॅटफॉर्म सपोर्ट आणख काही वर्षे देण्यात येणार असल्यामुळे मदरबोर्ड लगेच जुना झाला आणि नवा प्रोसेसर घेतला की मदरबोर्डही नवा घ्याच असा इंटेलसारखा हट्ट AMD करत नाही. मदरबोर्ड तोच ठेऊन आणखी काही वर्ष आपण केवळ प्रोसेसर बदलत राहून अपडेटेड राहू शकतो.

भारतात हे नवे 3960X, 3970X, 3950X, 3900X प्रोसेसर MDComputers, PrimeABGB, Vedant Computers या ऑनलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

Exit mobile version