Sony ZV-1 सादर : व्लॉगर्स, यूट्यूबर्स व क्रिएटर्ससाठी नवा पर्याय!

सोनीने आज Sony ZV-1 नावाचा पॉइंट अँड शूट कॅमेरा सादर केला असून हा प्रामुख्याने व्लॉगर्सना समोर ठेवून तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रथमच फ्लिप आउट डिस्प्ले म्हणजे कॅमेरापासून बाजूला उघडता येणारा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याची गेली अनेक वर्षं मागणी केली जात होती. इतर ब्रॅंड्सच्या कॅमेरामध्ये दिसणारा असा डिस्प्ले सोनीमध्ये पहिल्यांदाच जोडला गेला आहे. काही प्रमाणात ग्राहकांची मागणी लक्षात घेतली म्हणायला हरकत नाही. यूट्यूबर्स, व्लॉगर्स, क्रिएटर्स यांच्यासाठी नक्कीच उत्तम पर्याय आहे.

अपडेट (२६/०७/२०२०) : हा कॅमेरा ६ ऑगस्टपासून भारतात उपलब्ध होत असून प्रथम अॅमेझॉनच्या प्राइम डे सेलमध्ये हा ७७९९० या किंमतीत उपलब्ध होत आहे.

या कॅमेरामध्ये 20-megapixel चा 1-inch सेन्सर असून यामध्ये 24-70mm f/1.8-2.8 लेन्स दिलेली आहे. 4K 30fps व्हिडिओ रेकॉर्डिंग असून 1080p मध्ये 120 fps आणि 960fps पर्यंत स्लो मो रेकॉर्ड करता येईल. शिवाय यामध्ये मोठ्या कॅमेरामध्ये असलेली real-time eye AF ही खूप वेगवान ऑटोफोकस सिस्टम सुद्धा आहे! यामध्ये नवीन product showcase सुविधा असून याद्वारे वस्तु रिव्यू करणाऱ्या क्रिएटर्सना कॅमेरासमोर वस्तु दाखवत व्हिडिओ रेकॉर्ड करणं फार सोपं होणार आहे! सोबत HLG/HDR, S-Log3 and S-Log2 या कलर प्रोफाइलसुद्धा आहेत. Image stabilization active mode (optical and electronic) देण्यात आलं आहे. याची किंमत $799 (~६१०००) इतकी आहे.

Sony ZV-1 Specs :

Exit mobile version